शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : १७ मेपर्यंत औरंगाबाद पूर्ण बंद; सम-विषमची शिथिलता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:11 IST

अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस सर्व काही राहणार बंद

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचा आदेश शहरासाठी ७२ तास महत्त्वाचे

औरंगाबाद : लॉकडाऊनसाठी १७ मेपर्यंत असलेली सम-विषम शिथिलतेची सूट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा रद्द करीत १७ मेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश काढल्याचे विभागाकडून कळविण्यात आले. 

१ मेपासून सम-विषम तारखांना बाजारपेठा चालू-बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या निर्णयात सम तारखांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत होती. या सवलतीत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी पडू लागली. परिणामी, १०० रुग्णांच्या आत असलेली कोरोना रुग्णसंख्या सध्या ७५०पर्यंत पोहोचली आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढत गेला; परंतु सम-विषम तारखांचा लॉकडाऊन नियम काही बदलला गेला नाही. 

सर्व प्रकारचे पास रद्द केंद्रेकर यांनी येणाऱ्या तीन दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. साफसफाई, वीज, पाणीपुरवठा, हॉस्पिटल, मेडिकल सेवा सुरू राहील. ज्यांना शहरात फिरण्यासाठी सवलतीचे पास दिले आहेत, ते पासदेखील रद्द करण्यात आले आहेत. सध्यातरी पुढील ७२ तासांसाठी शहरात १०० टक्के संचारबंदी असणार आहे. १७ मेनंतर याबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय होतील. 

पोलीस करणार गुन्हे दाखल

लॉकडाऊन तीन अंतिम टप्प्यावर आहे.  संचारबंदी नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. आयुक्त म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये तीन दिवस पूर्ण संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.  शहरामध्ये सम आणि विषम तारखांचा निर्णय रद्द झाला आहे. उद्या १५ मेपासून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे वाहन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल. शिवाय लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी   सर्व पोलीस स्टेशनचे  अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद