शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : दूध, वर्तमानपत्र वगळता सर्व बंद; रस्त्यावर पायी जाणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:02 IST

संचारबंदीच्या नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे पोलिसांसोबत महापालिका यंत्रणा उभी राहणारअत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच इंधन मिळेल.

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. या काळामध्ये सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये नागरिकांना दूध आणि वर्तमापत्र उपलब्ध होईल. याशिवाय कोणत्याही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. यादृष्टीने विचारविमर्श सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. संचारबंदीच्या काळामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दोन शिफ्टमध्ये पोलिसांना सहकार्य करणार आहेत.

संचारबंदीच्या नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. मागील शहर पोलिसांना संचारबंदीत महापालिकेचे दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी दोन शिफ्टमध्ये मदत करणार आहेत. २० पॉइंटवर लॉकडाऊन सहायक, लॉकडाऊन सुपरवायझर, ५० ठिकाणी सेक्टर आॅफिसर यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी काही आॅब्झर्व्हर नेमण्यात येणार आहेत. शासकीय पेट्रोल पंप वगळता काही पंप चालू ठेवण्यासंदर्भात इतर पेट्रोल  पंपचालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच इंधन मिळेल.

रस्त्यावर पायी जाणाऱ्यांवरही गुन्हे : संचारबंदीच्या काळात रस्त्यावर पायी चालणाऱ्यांविरुद्धही यावेळी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पाण्डेय यांनी स्पष्ट केले. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात विविध कारणांनी लोक पायी फिरत होते.

मोटारसायकल जप्त होणार : संचारबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे दुचाकी किंवा इतर वाहन रस्त्यावर आल्यास ते जप्त केले जाणार आहे. शिवाय वाहनधारकांचा परवाना जप्त करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल होणार आहेत. यासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची टेस्टसंचारबंदीच्या काळामध्ये नागरिकांनी शहरात येण्याचे टाळावे. विविध  प्रमुख मार्गांवर महापालिका मोबाईल टीम उभी करणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची जागेवरच कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

वर्तमानपत्रांकडून यादी मागवणार : संचारबंदीच्या काळामध्ये शहरातील प्रमुख वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगून आम्ही यादी मागून घेणार आहोत. वर्तमानपत्रांकडून आलेल्या यादीनुसार संबंधितांना पास देण्यात येतील. पास नसलेल्या पत्रकारांना बाहेर पडता येणार नाही. सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वर्तमानपत्र वितरणास परवानगी असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद