शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

coronavirus : औरंगाबाद @ ७३०२; दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 18:41 IST

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३० झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी १६८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १००, तर ग्रामीण भागातील ६८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या ७३०२ झाली आहे. यासोबतच शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८२४ रुग्ण बरे झाले असून सध्या ३१४८ जणांवर उपचार सुरू आहेत. 

दोघा बाधितांचा मृत्यू हर्सूल, जटवाडा येथील ५५ वर्षीय महिला आणि विहमांडवा, पैठण येथील ३२ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने बुधवारी दिली. या दोन्ही रुग्णांचा मृत्यू ७ जुलै रोजी झाला.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण हर्सुल जटवाडा रोड १, मिल कॉर्नर १, एन अकरा, हडको ५, सिडको १, अमृतसाई प्लाजा २१, भगतसिंगनगर १, एन सहा सिडको १, एन बारा, हडको, टीव्ही सेंटर १, एकनाथनगर १, शहागंज १, शिवाजीनगर २, कटकट गेट १, वसंत विहार १, हुसेन कॉलनी १, मारोतीनगर २, देवळाई १, सातारा गाव १, चिकलठाणा २, नंदनवन कॉलनी १, राजेसंभाजी नगर ३, स्वराजनगर १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, पिसादेवी १, समर्थनगर १, एन सात, आयोध्यानगर १, हर्सुल १, खोकडपुरा ३, पैठण गेट १, शिवशंकर कॉलनी ४, पवननगर १, जाफर गेट १, पद्मपुरा १४, दशमेशनगर १, गजानननगर २, रमानगर १, सुरेवाडी १, जालाननगर ३, ज्योतीनगर १, छावणी २, रामनगर १, फुले चौक, औरंगपुरा १, एसटी कॉलनी १, जाधववाडी ३, टीव्ही सेंटर २, शिवाजी नगर, गारखेडा १.

ग्रामीण भागातील रूग्ण दत्तनगर, रांजणगाव २, रांजणगाव २, कराडी मोहल्ला, पैठण १, वरूड काझी १, सारोळा, कन्नड १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, अजिंठा २०, वडगाव कोल्हाटी १, सिडको बजाजनगर १, वडगाव साईनगर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, वडगाव २, वडगाव, बजाजनगर १, विश्व विजय सो., बजाजनगर १, एकदंत सो., बजाजनगर १, आनंद जनसागर, बजाजनगर १, वळदगाव १, सुवास्तू सो., बजाजनगर १, सासवडे मेडिकल जवळ, बजाजनगर ६, तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाजनगर ४, साराकिर्ती, बजाजनगर २, गणपती मंदिरासमोर, बजाज नगर २, पाटोदा, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी, संगमनगर, बजाजनगर २, अन्य १, बालाजी सो., बजाजनगर ४, लक्ष्मीनगर, पैठण ४, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १, नेहा विहार, तिसगाव बजाज नगर १. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद