शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

coronavirus : औरंगाबाद @ १३२७ : दिवसभरात २२ बाधित रुग्णांची वाढ, तीन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:52 IST

कोरोना संशयीत म्हणून उपचार सुरु होते

औरंगाबाद : शहरातील इंदिरानगर ( बायजीपुरा ) येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  सोमवारी (दि. २५) सायंकाळी ५.१५ वाजता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीत त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या मृत्यूमुळे शहरातील एकूण मृतांची संख्या ५९ झाली आहे. शहरात मंगळवारी दिवसभरात २२ बाधितांची वाढ झाली असून एकूण तीन मृत्यू झाले आहेत.

कोरोना संशयीत म्हणून उपचार सुरु असतांना इंदिरानगर ( बायजीपुरा ) येथील ५५ वर्षीय महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. मधुमेह, श्वसनविकारासोबत कोव्हीडमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.

दरम्यान, शहरातील जयभीमनगर आणि जाधववाडी येथील कोरोनाबाधित वृद्धांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिली. जयभीमनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात २४ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच दिवशी रुग्णाला घाटीत संदर्भीत करण्यात आले. भरतीवेळीच रुग्णाची प्रकृती गंभीर होती. मधुमेह, बीपी आदी व्याधीसह तीव्र श्वसन विकारामुळे त्यांना कृत्रिम श्वास देण्यात आला होता. त्यांचा कोरोनामुळे २६ मे मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला.

जाधववाडी येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ मे रोजी घाटीच्या कोव्हिड वॉर्ड सहा मध्ये भरती करण्यात आले. छातीचा व मेंदूचा क्षयरोग आणि श्वसन विकाराने त्यांना ग्रासलेले होते. १९ मे रोजी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर बनली. अखेर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

२२ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या १३२७ शहरातील २२ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या १३२७ झाली. मंगळवारी जुना मोंढा- १,  बायजीपुरा- १, रोहिदासपुरा-१, कांचनवाडी-१, भारतमातानगर (हडको)-१, नवीनवस्ती (जुनाबाजार )- ४,  जुना हनुमाननगर-१, हनुमान चौक-१, न्यायनगर-१, कैलाशनगर-१, रामनगर-१, एन ८ (सिडको )-४, रोशन गेट-१, एन ११ (सुभाषचंद्र नगर)- १, पुंडलीक नगर-१, भवानीनगर -१, या भागात कोरानाबाधित आढळले आहेत. यामध्ये ११ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद