शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

coronavirus : औरंगाबाद @ ११७९; दिवभरात ६० पॉझिटिव्ह, तीन मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 7:44 PM

शहरात उपचार घेवून परतणाऱ्यांची संख्या ४९६ झाली असुन सध्या ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : गुरुवारी सकाळी ५४ बाधित आढळून आल्यानंतर दुपारी आणखी ६ बाधितांचा वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११७९ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकुण बळींची संख्या ४२ वर गेली आहे. शहरात उपचार घेवून परतणाऱ्यांची संख्या ४९६ झाली असुन सध्या ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

शहरातील गरम पाणी १, शिवराज कॉलनी १, कैलास नगर १, सौदा कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, आझम कॉलनी ( रोशन गेट ) २, सिटी चौक ६, मकसूद कॉलनी २, हडको ( एन-१२ ) १, जयभीम नगर ११, हुसेन कॉलनी (गल्ली नं.९) १ , खडकेश्वर १,  न्याय नगर (गल्ली न.१८ ) २, हर्सुल कारागृह १, खिवंसरा पार्क ( उल्कानगरी ) २, टाइम्स कॉलनी ( कटकट गेट ) २, मुकुंदवाडी ५, आदर्श कॉलनी १, काबरा नगर १, उस्मानपुरा ३, हुसेन कॉलनी (गल्ली नं. १० ) ४, पडेगाव येथील मीरा नगर ४,  एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. घाटीत बाह्यरुग्ण विभागात काम करणारी ५० वर्षीय महिला कर्मचारी बाधित झाल्याचे बुधवारी रात्री समोर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेला संसर्ग चिंताजनक बनला आहे.

कोरोनामुळे तिघांचा मृत्यु दोन रुग्णांचा कोरोनामुळे बुधवारी (दि. २०) मृत्यू झाला आहे. तर आणखी एका रुग्णाचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाल्याने शहरातील आतापर्यंतच्या बळींचा आकडा ४२ झाला आहे. आसेफिया कॉलनी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा तर  रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धाचा या मृत्यूत समावेश आहे. मृत्यूनंतर या दोघांचे अहवाल प्राप्त झाल्याचे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. तर एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खडकेश्वर येथील  ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आसेफिया कॉलनी येथील ४८ वर्षीय पुरूषाला मंगळवारी घाटीत भरती करण्यात आले होतेय उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी सायंकाळी ५.२० वाजता पाॅझीटीव्ह प्राप्त झाला. दोन्ही बाजुंचा न्युमोनीया, कोरोना व हायपरटेन्शनमुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धाला बुधवारी घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काही तासांतच म्हणजे सकाळी सव्वा दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह असल्याचे रात्री स्पष्ठ झाले. तसेच खाजगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी अकरा वाजता खडकेश्वर, यशोमंगल सोसायटी येथील कोरोना बाधित ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. १८ मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. कोरोनामुळे दोन्ही बाजुंचा न्युमोनिया, रक्तवाहीन्यांतील अडथळ्यांचा आजार आणि श्वसन विकार यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे खाजगी रुग्णालयांच्या डाॅक्टरांनी कळवले आहे.  या मृत्युमुळे शहरातील मृतांची संख्या ४२ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद