शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : आणखी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह; शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:51 IST

प्राध्यापिकेच्या संपर्कातील अन्य लोकांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : कोरोना बाधित महिलेच्या अत्यंत जवळ संपर्कात असलेल्या एका महिलेचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आता आणखी पाच संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेने शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याचे निष्कर्ष काढला असून हे चित्र शहरवासियांसाठी दिसालादायक आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात परदेशातून येणाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात परदेशातून आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांना बाधा होते. सदर सहयोगी प्राध्यापिकेचा अहवाल नकारात्मक आल्याने अद्याप तरी शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नाही. प्राध्यापिकेच्या संपर्कातील अन्य लोकांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक संस्थेतील २० जणांचे घेतले स्वॅबकोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिका कार्यरत शैक्षणिक संस्थेतील २० जणांच्या लाळेचे नमुने (स्वॅब)  घेण्यात आले. आगामी २ ते ३ दिवसांत या सर्वांचा तपासणी अहवाल मिळणे अपेक्षित आहे.४या संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी, अशा ७२६ जणांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत कोणामध्येही लक्षणे आढळून आलेली नाहीत. खबरदारी म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सूचना केली आहे. येथील २० जणांचे स्वॅब बुधवारी घेण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांंनी यास दुजोरा दिला.४हे सर्व जण आता कोरोना संशयित असून, त्यांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. संशयितांची संख्या वाढत असल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे. 

नऊ कोरोना संशयितांचे घेतले स्वॅब; १४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षाखाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेच्या कुटुंबियांसह वाहनचालक, स्वयंपाकी आणि परदेश प्रवासात सोबत असलेल्या महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी बुधवारी (दि.१८) स्वॅब घेण्यात आला. दिवसभरात ९ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले. प्राध्यापिकेच्या संपर्कातील लोकांची प्राधान्याने तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसली तरीही स्वॅब घेऊन तपासणीची खबरदारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे. यानुसार बुधवारी प्राध्यापिकेच्या कुटुंबातील ३ सदस्यांसह वाहनचालक, स्वयंपाकीचा स्वॅब घेण्यात आला. तसेच परदेशातील प्रवासात सोबत असलेल्या महिलेचाही स्वॅब घेण्यात आला. दिवसभरात ९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी ५ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. यामुळे संशयितांची संख्या १४ झाली आहे. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. स्वॅब घेतलेल्यांपैकी २ रुग्ण दाखल झाले. तर अन्य लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला. आयसोलेशन वॉर्डात सध्या ४ रुग्ण दाखल असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद