शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: औरंगाबादेत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, ४७ नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 08:59 IST

एकूण बाधितांची संख्या 1696

ठळक मुद्देसध्या 524 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी ४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६९६ झाली आहे. यापैकी १०८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-४ ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा बुधवारी सकाळी ६.३० वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

नव्याने निदान झालेल्या रुग्णांत जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (२), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (१),उल्का नगरी (१),एन-६, संभाजी कॉलनी, सिडको (१),शरीफ कॉलनी (१),कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (१), सुराणा नगर (२), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

भुसावळ-जळगाव येथील रुग्णाचा मृत्यू

खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना भुसावळ-जळगाव येथील ४९ वर्षाच्या महिलेचा २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. ३१ मे पासून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद