शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे'; पैठण तहसीलदारांच्या आदेशाने अप-डाऊन करणारे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:48 IST

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे६० % कर्मचारी औरंगाबाद येथून अपडाऊन करतातऔरंगाबाद कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने चिंतेत भर

पैठण : औरंगाबाद शहर रेड झोन घोषित झाल्यामुळे औरंगाबाद शहरातून तालुका स्तरावर अप डाऊन करणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या मुख्यालयी राहण्याचे लेखी आदेश तहसीलदार पैठण यांनी आज दिले असून संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व कर्मचारी मुख्यालयी राहतात याची खातरजमा करून तहसीलदार यांना अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे.

पैठण तालुक्याला लागून असलेले औरंगाबाद शहर हे रेड झोन मध्ये दाखल झाले आहे. पैठण शहरातील ६०% शासकीय कर्मचारी औरंगाबाद शहरातून अपडाऊन करत असल्याचे समोर आले आहे. अशा आपत्तीसदृष्य परिस्थितीत विविध उपाययोजना करण्यात येत असून औरंगाबाद शहरात कोविड - १९ विषाणूचा प्रसार जलद गतीने होत असल्यामुळे पैठण तालुक्यात सदर विषाणूचा प्रसार व संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैठण तालुक्यातील परिस्थितीबाबत  तालुका स्तरावरील सर्व शासकीय व निमशासकीय , खाजगी कार्यालयांमधील अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी , ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी, मंडळ अधिकारी,  मंडळ कृषी अधिकारी,  ग्रामविस्तार, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी,  शिक्षक,  तलाठी,  ग्रामसेवक,  कृषी सहाय्यक,  आशा वर्कर, पोलीस पाटील,  कोतवाल  तसेच एमआयडीसी पैठण मधील विविध कंपनीतील कामगार,  मेडीकल असोशिएशन वकर्स,  यांनी त्यांच्या मुख्यालयी उपस्थित रहावे असे लेखी पत्र आज विविध शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना तहसीलदार यांनी बजावले आहे.

पैठण तालुक्यातील अधिनस्त सर्व कार्यालयांना हे आदेश लागू असल्याने सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयीन व क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी  कर्मचारी हे मुख्यालयी हजर राहत असल्याची खातरजमा करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर करावा असे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी गैरहजर असल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याचा कार्यालयीन प्रमुखांनी अनुपस्थित असल्याचा अहवाल नियुक्ती प्राधिकरणास देऊन संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ य साथरोग प्रतिबंधक कायदा - १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

६०% कर्मचाऱ्यांचे अपडाऊन;अंमलबजावणी कडे लक्ष.....पैठण शहरात विविध राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक,  खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कर्मचारी अधिकाऱ्याचे औरंगाबाद शहरातून अपडाऊन सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व बहुतेक कार्यालयाचे प्रमुखच औरंगाबाद शहरातून अपडाऊन करत असल्याने तहसीलदारांच्या आदेशाच्या अंमलबजावणी कडे पैठण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद