शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत १२०५ मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:55 IST

Coronavirus In Aurangabad :औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ एवढी झाली आहे, तर ४३ हजार ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ४५६ जणांवर उपचार सुरू आहेत गुरुवारी ६८ रुग्णांना उपचारानंतर सुटी मिळाली गुरुवारी ६० रुग्णांची वाढ; सात रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर गुरुवारी कोरोना मृत्यूची संख्या काहीशी वाढली. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आणि इतर जिल्ह्यांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ६० कोरोनारुग्णांची भर पडली, तर ६८ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ एवढी झाली आहे, तर ४३ हजार ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मार्चपासून आतापर्यंत एकूण एक हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६० रुग्णांत मनपा हद्दीतील ४९, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५७ आणि ग्रामीण भागातील ११ अशा एकूण ६८ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. रेणुकामाता मंदिर परिसर, बीड बायपास येथील ८८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर रोड, गणेश कॉलनीतील ६३ वर्षीय स्री, विमानतळ परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, दर्गा रोड परिसरातील ८१ वर्षीय पुरुष, रेल्वे स्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनीतील ७१ वर्षीय पुरुष आणि बुलढाणा जिल्ह्यातील ७७ वर्षीय पुरुष, जवळगाव जिल्ह्यातील ५२ वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण :व्यंकटेश कॉलनी १, रॉक्सी सिनेमा गृहाजवळ १, संगीता कॉलनी १, एन वन, सिडको ३, एन सहा, सिंहगड कॉलनी २, कांचनवाडी १, एन सात सिडको १, कैलासनगर १, एन तीन सिडको १, एन चार सिडको २, भगवती कॉलनी १, एमजीएम परिसर १, बीड बायपास १, एन नऊ, हडको पवननगर १, भावसिंगपुरा २, मिश्रा कॉलनी १, स्टेपिंग स्टोन शाळा परिसर १, सूतगिरणी चौक १, दिल्ली गेट ३, तोरण गडनगर १, बन्सीलालनगर १, ग्लोरिया सिटी पडेगाव १, जीडीसी हॉस्टेल परिसर १, आकाशवाणी परिसर १, शेंद्रा, एमआयडीसी १, नक्षत्रवाडी १, अन्य १६.

ग्रामीण भागातील रुग्ण : बायपास रोड, सिल्लोड १, वाळूज महानगर १, वरुड बु. १, अन्य ८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस