शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

CoronaVirus: सिल्लोड शहर आणि तालुक्यात १०० टक्के लॉकडाऊन; नागरिकांचे घरातच ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 4:00 PM

कोरोना रुग्ण सापडल्याच्या अफवेने मात्र खळबळ

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा खडा पहारानागरिक ही घरातच थांबलेकेवळ रुग्णालय, मेडिकल होतें सुरू

सिल्लोड : कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिल्लोड शहरासहित संपूर्ण तालुक्यात 100 टक्के बंद ठेवण्यात आले. यावेळी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह सर्व बंद होते. नागरिक सुद्धा घरात ठाण मांडून होते यामुळे अजिंठा पोलीस ठाणे, सिल्लोड शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावात  100 टक्के बंद पाळण्यात आला.

सरकारी रुग्णालय व  मेडिकल सेवा फक्त यावेळी सुरू होती.उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, अजिंठा पोलीस ठाण्याचे किरण आहेर रस्त्यावर फिरून परिस्तिथीवर लक्ष ठेऊन होते. यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही.कुणी ही यावेळी कायद्याचे उल्लंघन केले नाही सिल्लोड शहर, ग्रामीण, अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 उपविभागीय पोलीस अधिकारी ,एक पोलीस निरीक्षक, 4 सहायक पोलीस निरीक्षक, 4 फौजदार, सहित 140 पोलीस कर्मचारी, 65 होमगार्ड तैनात करण्यात आले होते. पोलीस कर्मचाऱ्यानी यावेळी  चोख बंदोबस्त ठेवला होता. 

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, शिवना, गोळेगाव, पानवडोद, उंडणगाव , अभई,घाटनांद्रा, केळगाव, आमठाणा, अंधारी, बोरगाव बाजार, भराडी, उपळी, निल्लोड, के -हा ळा,पळशी, लिहाखेडी,  सारोळा, अनवी, डोंगरगाव, बनकीन्होळा, भायगाव, भवन,  सर्कलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

गेल्या एक महिन्यापासून सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे मात्र मंगळवारी जी लॉक डाऊन झाला तो त्या पेक्षा वेगळा होता.यात कुणीही नागरिक रस्त्यावर दिसले नाही.2 रुपयांची कोथमबीर, 4 रुपयांचे मेडिकल, चहा पुडी घेऊन जाण्याचा भहाना करणारे सर्वच पोलिसांच्या कार्यवाही मुळे घरातच दिसले.गावा गावात गल्ली बोळात, मुख्य रस्त्यावर बेरिकेट लावून नागरिक व पोलिसांनी  जागो जागी रस्ते बंद केले होते.यामुळे डुर डुर करत फिरणाऱ्या मोटार सायकली यावेळी रस्त्यावर दिसल्या नाही. तुरळक रूग्ण दवाखान्यात व मेडिकल वर दिसले.

अफवांवर विश्वास ठेवू नये... सिल्लोड  शहर किंवा ग्रामीण भागात  कोणत्याही ठिकाणी  एकही कोविड 19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. यामुळे घाबरू नका... अफवांवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरविनाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे.यामुळे घरातच थांबा ..बाहेर निघू नका..व कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आव्हान उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारे,वैधकीय अधीक्षक सरदेसाई , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संजय सोनवणे , किरण कुलकर्णी यांनी केले आहे.

बंद पुकारल्याने अफवा पसरलीपोलीस प्रशासनाने  मंगळवारी 100 टक्के बंद पुकारल्याने सिल्लोड शहर तालुक्यात कोरोना रुग्ण असल्याची अफवा पसरवली होती.मात्र तहसीलदार,नायब तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांनी सोशल मीडियावर मेसेज देऊन जागृती केली.त्या मुळे कोरोना रुग्ण सापडल्याची ती केवळ अफवा होती.हे लोकांच्या लक्षात आले.व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद