शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणावर कोरोनाचे ढग : वेरूळकरांची अर्थव्यवस्था ढासळली; अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:26 IST

सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणाऱ्या श्रावण महिन्यातही मंदिर बंद राहणार असल्याने जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

ठळक मुद्देश्रावण महिन्यात दर सोमवारी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.या महिन्यात जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचा व्यवसाय होतो. 

- सुनील घोडके 

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने मंदिर प्रशासनासह अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातही सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणाऱ्या श्रावण महिन्यातही मंदिर बंद राहणार असल्याने जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

श्रावण महिन्यात दर सोमवारी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. त्यामुळे महिनाभर येथील व्यावसायिक कामधंद्यात मग्न असतात. घृष्णेश्वर मंदिर परिसरात बेलफूल, तसेच इतर छोटे-मोठे हॉटेल, दुकाने, फोटोग्राफर, हॉकर्स असे २५० जण व्यवसाय करतात. या सर्वांचा श्रावण महिन्यात जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचा व्यवसाय होतो. 

उत्पन्नाचा स्रोतच नाहीश्रावण महिन्यात मंदिर बंद असल्याने व्यावसायिक, तसेच मंदिरातील पुजारी घरीच बसून आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत आहेत.

सर्वच विक्रेते हवालदिल श्रावण महिन्यात तरी श्री घृष्णेश्वर मंदिर उघडेल या आशेवर व्यावसायिक होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने घृष्णेश्वर मंदिर श्रावण महिन्यात बंदच राहणार असल्याचे सांगितल्यानंतर मंदिर परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक, हॉकर्स, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज मालक, बेलफूल विक्रेते, धार्मिक साहित्य विक्रेते हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन