नोडल अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी बैठक घेऊन २१ जूनपर्यंत दुकानातील कामगारांसह कोरोना चाचणी करून सदरील चाचणी अहवाल दुकानाच्या दर्शनी भागावर लावण्याचा आदेश व्यापाऱ्यांना दिला होता. या आदेशाला अनेकांनी गांभीर्याने घेतले नाही. कोरोना चाचणी न करताच शहरासह तालुक्यातील अनेक आस्थापने सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. याची गंगापूर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, ३० तारखेपर्यंत उर्वरित व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अन्यथा जे व्यापारी कोरोना चाचणीशिवाय आपली दुकाने सुरू ठेवतील. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची आस्थापने सील करण्यात येईल व अशा व्यापाऱ्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे यांनी दिली आहे.
कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:05 IST