शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : खासगी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करणार कोण  ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 12:56 IST

corona virus : विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटल्सने त्या व्हेंटिलेटरचे बिल रुग्णांकडे किती आकारले, बिलात त्याची नोंद आहे की नाही, हे देखील तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे घाटी प्रशासनानेच दिले, व्हेंटिलेटर विभागात वाटायला

औरंगाबाद : पंतप्रधान सहायता निधीतून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सध्या गाजतो आहे. हे व्हेंटिलेटर निकृष्ट की उत्कृष्ट, यावरून जोरदार राजकारण पेटले असून, सरकारी व्हेंटिलेटर खासगी हॉस्पिटलला दिले, त्याचे ऑडिट कसे आणि कोण करणार, असा नवीन मुद्दा आता समोर आला आहे.

विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटल्सने त्या व्हेंटिलेटरचे बिल रुग्णांकडे किती आकारले, बिलात त्याची नोंद आहे की नाही, हे देखील तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे. विभागीय प्रशासनातील वरिष्ठ सुत्रांनी सांगितले, १५० व्हेंटिलेटर केंद्र शासनाकडून आल्यानंतर त्यातील ५५ व्हेंटिलेटर विभागात देण्यासाठी स्वत: घाटी प्रशासनानेच तयारी दर्शवली. विभागात काही ठिकाणी ते व्हेंटिलेटर गरजेचे होते, म्हणून ते उपलब्ध करून देणे हा काही गुन्हा नाही. शासनाची यंत्रणा शासनाने वापरल्यास काही हरकत नाही. परंतु, स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर देण्याबाबत आमचा काहीही संबंध नाही.ते व्हेंटिलेटर विभागीय प्रशासनाने पाहिलेले नाहीत. घाटीला व्हेंटिलेटर आल्यावर अधिष्ठातांनी जास्तीचे व्हेंटिलेटर आहेत, कुणाला द्यायचे असतील तर द्या. ५५ व्हेंटिलेटर विभागात जिल्ह्यांना दिले. विभागीय आयुक्तांनी याबाबत स्वत: मागणी केलेली नाही. परंतु, विभागीय प्रशासनाला ते देण्याचा अधिकार आहे.खासगी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारत असल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येत आहे. परंतु, त्यात व्हेंटिलेटर कोणते वापरले, याबाबत काहीही तपासणी केली जात नाही. दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रकरणात काहीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही.

व्हेंटिलेटरवर कुणाचे उपचार केले याचे ऑडिट व्हावेखासदार इम्तियाज जलील म्हणाले, एमजीएम, एशियन हॉस्पिटल, पॅसिफिक, सिग्मा आदी हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर दिले आहेत. तसेच नवीन काही कोविड हॉस्पिटल्सनादेखील देण्यात आले. या व्हेंटिलेटरने गरीब आणि गरजू कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. जिल्हाधिकारी, घाटी, मनपा यापैकी कोणत्याही यंत्रणेने यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. याचे ऑडिट झाले पाहिजे. नेमके हे व्हेंटिलेटर कोणासाठी वापरले जात आहेत. त्यावर उपचार करणाऱ्या रुग्णांकडून बिलात पैसे आकारले जात आहेत. हे पूर्वीच होणे गरजेचे होते. परंतु, लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सगळे समोर आले. घाटीच्या अधिष्ठातांना याबाबत जबाबदार धरण्यात येईल. त्या खुलेआम सांगत आहेत की, व्हेंटिलेटर उघडले नाहीत ते काही कामाचे नाहीत. पीएम केअर फंडाव्यतिरिक्त इतर व्हेंटिलेटर आले होते. ते कुठे गेले, हे देखील समोर आले पाहिजे. घाटीची क्षमता १३० व्हेंटिलेटरची आहे, तेथे ३०० व्हेंटिलेटर बसवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्वानुमते याचा विचार होणे गरजेचे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद