शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

corona virus : सौदीतून परतलेल्या युवकाची ग्रामस्थांना धास्ती; प्राथमिक तपासणीनंतर दिला घरी राहण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:48 IST

हा युवक मागील दोन वर्षांपासून सौदी अरेबियात कामास होता.

ठळक मुद्दे तडखेल गावात आरोग्य पथक लागले कामाला

देगलूर (जि़ नांदेड) : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सौदी अरेबियातून तालुक्यातील तडखेल येथे आपल्या गावी आलेल्या एका २२ वर्षीय युवकाची गावकऱ्यांनी धास्ती घेतली. या युवकास देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून केलेल्या प्राथमिक तपासणीनंतर तो परत गावी गेला.

हा युवक मागील दोन वर्षांपासून सौदी अरेबियात कामास होता. कोरोनाच्या भीतीमुळे तो ३ मार्च रोजी हैदराबादमार्गे तडखेल येथे आला. या युवकास अनेक वेळा खोकलताना काही ग्रामस्थांनी पाहिले. तीन दिवस त्यास खोकला होता. मात्र तीन दिवसानंतर त्याचा खोकला कमी झाला. असेच दहा दिवस उलटून गेले. मात्र एकाने ही बाब शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे, वैद्यकीय अधीक्षक संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर त्या युवकास रुग्णवाहिकेतून आणण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला. 

परंतु डॉक्टरांचे पथक गावात गेले तर घबराट पसरेल, असा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाल्यामुळे त्यांनी त्या युवकाशी फोनवर संपर्क साधून आॅटोत देगलूर येथे येण्याच्या सूचना दिल्या. देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तो युवक आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी केली. यावेळी त्या युवकास ताप, खोकला अशी कोणतीच प्राथमिक लक्षणे डॉक्टरांना आढळून आली नाहीत. त्या युवकास कोरोना व्हायरसची कोणतीच प्राथमिक लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी सांगितले. मात्र तरीही खबरदारी म्हणून दोन दिवस रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आले होते. मात्र आपल्याला काहीच त्रास नाही, असे सांगत तो युवक गावी परत गेला. 

नागरिकांनी घाबरू नये -वैद्यकीय अधीक्षक हा युवक सौदी अरेबियातून येऊन बारा दिवस उलटले. कोरोनाची लक्षणे आठ दिवसांतच कळून येतात. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो बाहेरच्या देशातून आल्यामुळे आणखी दोन दिवस आरोग्य विभागाचे कर्मचारी तडखेल येथे जाऊन त्याची तपासणी करतील. फक्त खबरदारी म्हणून त्यास स्वतंत्र खोलीत ठेवण्याच्या सूचना त्याच्या कुटुंबियास दिली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच आपल्या गावी कोणी बाहेरच्या देशातून आल्यास आम्हाला सूचना द्याव्यात, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संभाजी पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडdoctorडॉक्टर