शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामात गांभीर्य नाही; संतप्त उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:03 IST

Corona Virus:प्रशासनाला चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल केली जात आहे, यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी लोक जुमानत नाही हे ठेवणीतील उत्तर देऊन बचाव करण्याचा प्रयत्न केला.

पैठण ( औरंगाबाद )  : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामच होत नाही. प्रशासनाला चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल केली जात आहे, यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे, हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे यांनी आरोग्य विभागास दिला. ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

काही ठिकाणी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा गांभीर्याने काम करत नसल्याने कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे भीषण वास्तव उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत समोर आले. आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन अवलंबून असते. मात्र, आकडेवारी घरी बसून देणार असाल तर ही प्रशासनाची फसवणूक आहे. याबाबत कठोर पावले उचलण्यात येतील अशी तंबी डॉ. मोरे यांनी दिली.  डॉ. मोरे हे पैठण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेत असून मंगळवारी ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची यादी येथे उपलब्ध नव्हती. यावरून येथील कर्मचाऱ्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची कामेच केली नसल्याचे उघड झाले. या प्रकाराने डॉ. मोरे यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कर्मचाऱ्यांनी लोक जुमानत नाही हे ठेवणीतील उत्तर देऊन बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  यावर त्यांचे समाधान झाले नाही. 

तालुका आरोग्य अधिकारी डाँ.भूषण आगाज यांनी ढाकेफळ प्रा.आ.केंद्राला वारंवार भेट दिली. मात्र, कामात सुधारणा झाली नाही. याबाबत मोरे यांनी खंत व्यक्त करुन कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवा असे आदेश दिले. ढाकेफळ येथे ३० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल असे संकेत यावेळी डॉ. मोरे यांनी दिले. ग्रामदक्षता समितीने सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कोरोना टेस्ट वाढवा, दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडा काही अडचण असेल तर संकोच न बाळगता संपर्क साधा असे आवाहन मोरे यांनी बैठकीत केले. 

बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ भूषण आगाज, वैद्यकीय अधिकारी अतुल बोरे, डॉ.सुदर्शन काळे, ढाकेफळचे सरपंच भिमा मोरे, तलाठी ज्ञानेश्वर साळुंके, पोलीस पाटील गोकुळ आढाव, ढाकेफळ जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधुताई घुले, कैलास ढोले,  मुलानी वाडगाव आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश शिंदे, संतोष शिरसाठ, एस.एच.भवर, शिवाजी थोटे, मिलींद गायकवाड, परिचारीका मोलके, ए.डी.कांबळे, चंदा सोनटक्के, उषा गायकवाड, कुलकर्णी, समीना शेख, यशोदा जऱ्हाड, भतनागे, एस.पी.सातपुते, साळवे, ज्योती लिपाने, उषा आव्हाड, विजय गायकवाड, संदिप हानवते, अजय शेजूळ,अंगणवाडी कार्यकर्ती दगडाबाई मुळे, शोभा साबळे, मिरा गोरे, छबाबाई पडोळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद