शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी वॉर्डनिहाय आणि बाजारांच्या गावात राहणार पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 17:06 IST

corona virus मिशन बिगेन अगेनच्या नियमांचे सादरीकरण करुन नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर करण्‍यात येणाऱ्या कारवाईबद्दल माहिती दिली.

ठळक मुद्देराज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी १५ एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत.

औरंगाबाद : सध्याची कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी १५ एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. ‍

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित हेाते.प्रारंभी सुनील चव्हाण यांनी मिशन बिगेन अगेनच्या नियमांचे सादरीकरण करुन नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर करण्‍यात येणाऱ्या कारवाईबद्दल माहिती दिली. वॉर्डनिहाय तसेच ग्रामीण भागात बाजाराची गावे शोधून तिथे पथक नेमण्‍यात यावे, पथकात जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे २ व पोलीस प्रशासनाचा १ कर्मचारी असे प्रत्‍येकी ३ पर्यवेक्षक असावेत, तसेच पाच पथकांसाठी एक निरीक्षक असावा, महापालिकेतील गर्दीच्‍या तसेच संवेदनशील वॉर्डामध्‍ये आवश्‍यकतेप्रमाणे ४ पर्यवेक्षकांचे पथक असावे, त्यामध्ये १ कर्मचारी महापालिकेचा असेल, प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही दोन पथके तयार करावीत.

तसेच प्रत्येक पथकामार्फत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या दैनंदिन किमान १०० वाहनांवर कारवाई करावी, रिक्षामध्‍ये दोनच प्रवासी असावेत, महामंडळाच्‍या बसेस, खासगी टुर्स व ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या या सर्वांना ५० टक्‍के प्रवासी बसवणे याबाबत सूचना देण्‍यात याव्‍यात, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने आपल्‍या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची ५ पथके तयार करावीत, प्रत्येक पथकाने शहरातील राज्‍य उत्‍पादन शुल्‍कच्‍या अखत्‍यारीतील दुकाने रात्री वेळेत बंद होण्‍याच्‍या अनुषंगाने कारवाई करावी तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या दैनंदिन किमान १० आस्‍थापनांवर कार्यवाही करावी, अन्‍न व औषध प्रशासनाने तीन पथके गठीत करुन नियमांचे पालन न करणाऱ्या दैनंदिन प्रत्येकी किमान २० आस्‍थापनांवर कारवाई करावी, असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद