शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रेशन भोवले; पोलिस येताच कार्यकर्ते फरार तर बर्थडे बॉय भावी नगरसेवक पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 14:59 IST

corona virus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शुक्रवारी रात्री पैठण शहरातील नवीन कावसान भागात वाढदिवस साजरा करणाऱ्या भावी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देबर्थडे बॉयसह १५ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

पैठण : ‘वाढदिवस आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा’ म्हणत भावी नगरसेवकाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलीस येताच धूम ठोकली; परंतु बर्थडे बॉय एकटाच पोलिसांच्या तावडीत सापडल्याने त्यास वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करावा लागला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शुक्रवारी रात्री पैठण शहरातील नवीन कावसान भागात वाढदिवस साजरा करणाऱ्या भावी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पैठण नगर परिषदेची निवडणूक वर्षभरावर आल्याने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात सध्या भावी नगरसेवक प्रकट होत आहेत. चाणाक्ष कार्यकर्ते अनेकांना भावी नगरसेवक बनवून आपली सोय करण्यातही अनेक जण पुढे आहेत. पैठण शहरातील नवीन कावसान भागात राहणाऱ्या गणेश खेडकर या तरुणास परिसरातील नागरिकांनी भावी नगरसेवक म्हणून पदवी बहाल करून टाकली आणि तोही भावी नगरसेवक म्हणून वाॅर्डात फिरू लागला. शुक्रवारी त्याचा वाढदिवस असल्याने राजकारणात एन्ट्री मारण्यासाठी तो जोरात साजरा करण्याचा सल्ला मित्रमंडळीने त्यास दिला होता.

शहरभर गणेशचे भावी नगरसेवक म्हणून डिजिटल बॅनर लावत वाढदिवस साजरा करण्यासाठी केक, हार, बुके, खुर्च्या, कार्यक्रमाचे बॅनर, अल्पोपहार, फटाके आदींची तजवीज सुद्धा करण्यात आली. बर्थडे बॉयचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच भावी नगरसेवक म्हणून कार्यकर्त्यांनी घसा ताणून जोरदार घोषणाबाजी केली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी अवकाशात फुटणारे रंगीत फटाके फोडले आणि घात झाला. नेमके त्यावेळेस गोल नाका परिसरात पोलिसांची गाडी गस्तीवर असल्याने कोण फटाके फोडत आहे, याचा माग घेत फौजदार रामकृष्ण सागडे यांच्यासह पोलीस वाढदिवसाच्या ठिकाणी पोहचले आणि पळापळ सुरू झाली. पोलिसांना पाहताच प्रथम कार्यकर्ते फरार झाले. तोवर गणेशला आलेल्या संकटाची चाहूल लागली होती. पोलिसांनी बर्थडे बॉयला पोलीस ठाण्यात आणले.

बर्थडे बॉयसह १५ जणांवर गुन्हा वाढदिवसाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवल्याचे बर्थडे बॉयने सांगत दुसरी आफत स्वत:वर ओढून घेतली. यामुळे वाढदिवस कोणी ठेवला त्यांची नावे अखेर गणेश खेडकरला पोलिसांना सांगावी लागल्याच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशने पोलीस ठाण्यात आपले नाव सांगितले म्हणून संबंधित कार्यकर्तेही गणेशवर चांगलेच डाफरले असल्याचे पुढे येत आहे. विरोधकांनी मुद्दाम आकाशात फुटणारे फटाके वाजवून गणेशचा गेम केल्याची चर्चा वॉर्डात सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गणेश खेडकरसह अन्य १५ जणांविरोधात पैठण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी