शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

Corona Virus : एकमेव आधार कोरोनाने नेला; या पालकांना मदत कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 14:47 IST

Corona Virus : ज्या वयोवृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा, मुलगी कोरोनाने हिरावून घेतली आहे, त्या माता-पित्यांना मदत कोण करणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाची निराधार पाल्यांना मदत करण्याची घोषणा

- राम शिनगारे

औरंगाबाद : देशात शेकडो मुलांचे आई-वडील कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावले आहेत. या निराधार झालेल्या पाल्यांना केंद्र आणि राज्य शासनाने आर्थिक मदतीसह शैक्षणिक मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी योजनाही बनविण्यात येत आहे. हे सकारात्मक पाऊल असतानाच ज्या कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा, मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला, अशा मुलांच्या पालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पालकांनी कोणाच्या मदतीने उर्वरित आयुष्य घालवावे, त्यांना आर्थिक, मानसिक, आरोग्य, आदी बाबतीत कोण मदतीचा हात पुढे करणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्यानंतर याविषयी राज्य शासनानेही मदतीची योजना जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा खर्च बालसंगोपन योजनेतून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नातेवाईक या बालकाचे संगोपन करण्यास तयार असल्यास त्यांना महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतून अनुदानही देण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय असतानाच ज्या वयोवृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा, मुलगी कोरोनाने हिरावून घेतली आहे, त्या माता-पित्यांना मदत कोण करणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य शासनाने अशा पालकांविषयीही योजना जाहीर करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेचज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वेगळेच असतात. हे प्रश्न मुलगा किंवा मुलगी असतानाही सोडविताना संबंधितांची दमछाक होत असते. मात्र, कमावता मुलगा गेल्यामुळे बाहेरील कोणीही या ज्येष्ठांचे संगोपन करताना प्रश्न अधिक जटिल होऊन जातात. यात सामाजिक, मानसिक आरोग्य, याशिवाय विविध आजारांचा समावेश होतो. वृद्ध व्यक्तींना काही सवयी असतात. त्या सवयी या काळातील नवतरुणांना चुकीच्या वाटतात. यातूनही अनेक समस्या निर्माण होत आहेत.

अशा पालकांना अर्थसाहाय्याची गरजसंरक्षण क्षेत्र वगळता कोणत्याच विभागात मुलगा गमावल्यानंतर आई-वडिलांना मदत करण्याची योजना नाही किंवा तरतूद केलेली नाही. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांप्रमाणेच कमावता एकमेव मुलगा मरण पावलेल्या आई-वडिलांनाही आर्थिक साहाय्य झाले पाहिजे. त्यांच्या देखभालीचे नियोजन केले पाहिजे, तरच अशा पालकांना आधार मिळेल. त्यांचे आगामी काळातील जगणे सुसह्य होईल, अशी आशा आहे,- दीपक नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते

कोरोनाचे एकूण रुग्ण : १,४३,९४६बरे झालेले : १,३८,४१६सध्या उपचार घेत असलेले : २२४६एकूण मृत्यू : ३२८४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद