शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : औरंगाबाद शहरात अवघे ३७, ‘ग्रामीण’मध्ये १०७ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:45 IST

Corona Virus: सध्या जिल्ह्यात २,०९२ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देउपचारादरम्यान नऊ रुग्णांचा मृत्यू सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृतांची संख्या एकेरी आकड्यात राहिली.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १४४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात अवघे ३७, तर ग्रामीण भागातील १०७ रुग्णांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृतांची संख्या एकेरी आकड्यात राहिली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार २३५ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४३ आणि ग्रामीण भागातील ६१, अशा २०४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पैठण येथील ७८ वर्षीय महिला, पाटेगाव, पैठण येथील ७० वर्षीय महिला, पिशोर, कन्नड येथील ८८ वर्षीय महिला, रांजणगाव, वाळूज येथील ७५ वर्षीय महिला, देवगाव, कन्नड येथील ८२ वर्षीय महिला, सिडकोतील ५० वर्षीय पुरुष, अरिहंतनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, हस्ता, कन्नड येथील ४७ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर १, घाटी १, नक्षत्रवाडी १, कांचनवाडी १, जवाहर कॉलनी १, पडेगाव १, चिकलठाणा १, मुकुंदवाडी १, म्हाडा कॉलनी १, राजीव गांधीनगर १, विष्णूनगर २, जुना मोंढा, भवानीनगर १, सिद्धार्थनगर टी.व्ही. सेंटर २, संभाजीनगर, हर्सूल १, द्वारकानगर १, पिसादेवी रोड, हर्सूल २, सारारिद्धी, हर्सूल १, मौर्या पार्क, हर्सूल १, जुना मोंढा २, एन-११ येथे १, मिटमिटा, पडेगाव १, अन्य १२.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ५, देऊळगाव, ता. सिल्लोड १, कन्नड १, कसारखेडा, ता. खुल्ताबाद १, फुलंब्री १, अलीवाडा २, चिंचोली तांडा १, वाळूज २, अन्य ९३.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या