शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शहरात नाही; कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास जेथे गर्दी, जास्त रुग्ण, तेथेच लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 13:21 IST

corona virus शहराच्या ज्या भागात गर्दी जास्त आहे आणि बाधितांची संख्या देखील जास्त आहे, त्या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांचा इशारा सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना लॉकडाऊनची भीती वाटत आहे.

औरंगाबाद : शहरात ३०० ते ३५० रुग्ण आढळून आले तर विदर्भातील जिल्ह्याप्रमाणे औरंगाबादेत सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. ज्या भागात नागरिकांची सर्वाधिक गर्दी होत आहे, ज्या ठिकाणी रुग्णमोठ्या संख्येने आढळून येत आहेत, तेथे संचारबंदी लावण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना लॉकडाऊनची भीती वाटत आहे. या संदर्भात पत्रकारांनी पाण्डेय यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संपूर्ण शहर लॉकडाऊन केले पाहिजे असे नाही. शहराच्या एका भागात देखील लॉकडाऊन केले जाऊ शकते. त्यामुळे शहराच्या ज्या भागात गर्दी जास्त आहे आणि बाधितांची संख्या देखील जास्त आहे, त्या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

कठोर निर्णय हिताचे ठरत आहेतशहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे, ही बाब लक्षात घेऊन शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगल कार्यालयांवर कडक निर्बंध घातले आहेत, त्यामुळ‌े कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. १९ फेब्रुवारी रोजी १४३ कोरोनाबाधित होते. २० फेब्रुवारी रोजी ही संख्या १२० होती. २२ फेब्रुवारी रोजी २१३, तर २३ फेब्रुवारी रोजी २१९ रुग्ण आढळले होते. त्यामुळे आता विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षी या आजाराला वैश्विक महामारीचे स्वरूप होते. आता तसे स्वरूप राहिलेले नसले तरी हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे हे मात्र निश्चित. लसीकरणाच्या नंतर २०२२ मध्ये हा आजार सामान्य होईल असेही ते म्हणाले.

शहरात किमान ३० लसीकरण केंद्रेज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे असे लक्षात येईल, त्या भागात लसीकरणाचे केंद्र सुरू केले जाईल. येत्या काही दिवसांत शहरात किमान ३० ठिकाणी लसीकरणाचे केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद