शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : महापालिकेतर्फे २६ कन्टेनमेंट झोन जाहीर; तीन श्रेणीत विभागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 12:51 IST

मागील वीस दिवसांत केलेल्या या सर्वेक्षणात अभ्यासाअंती २६ वसाहती कन्टेनमेंट झोन अर्थातच हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत.

ठळक मुद्दे स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण पूर्ण होताच घोषणा३७ आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वर्कर्सकडून सर्वेक्षण पूर्ण केले.

औरंगाबाद : महापालिका हद्दीत मागील दीड महिन्यापासून दररोज एक ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ज्या भागातून सर्वाधिक रुग्ण येत आहेत त्या भागाला महापालिकेने कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर सर्वत्र टीका सुरू करण्यात आली. प्रशासनाने तातडीने स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांकडून झोन निश्चितीचे काम करून घेतले. शनिवारी सायंकाळी शहरात एकूण २६ कन्टेनमेंट झोन असल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणीत या झोनची विभागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपलमेंट कॉर्पोरेशन टीमकडून शहरातील कन्टेनमेंट झोन निश्‍चित करण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले. होती. स्मार्ट सिटीच्या टीमने शहरातील ३७ आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वर्कर्सकडून सर्वेक्षण पूर्ण केले. मागील वीस दिवसांत केलेल्या या सर्वेक्षणात अभ्यासाअंती २६ वसाहती कन्टेनमेंट झोन अर्थातच हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत. तीन प्रकारात कन्टेनमेंट झोनचे वर्गीकरण करून ते जाहीर केले आहेत. पहिल्या प्रकारात पंधरापेक्षा जास्त आणि ५० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत, अशा ६ वसाहती मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. तर ज्या भागात ५० पेक्षा जास्त आणि १०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत, अशा १२ वसाहतींना मध्यम (मीडियम) कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर १०० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८ वसाहतींना लार्ज कन्टेनमेंट झोन (बिग हॉटस्पॉट) म्हणून रविवारी पालिकेने जाहीर केले.

मोठे हॉटस्पॉट असलेले ८ भागशिवाजीनगर : रामकृष्णनगर, काबरानगर, गारखेडा.सिडको एन ९ : पवननगर, आंबेडकरनगर, शिवनेरी कॉलनी.सिडको एन-६ : मोतीवालानगर, एमजीएम परिसर, किराडपुरा.उल्कानगरी : बाैद्धनगर, उत्तमनगर, टिळकनगर, गारखेडा.कांचनवाडी : वॉर्ड क्रमांक-१०७ विटखेडा परिसर.ज्योतिनगर वॉर्ड : दशमेशनगर.पुंडलिकनगर : गारखेडा परिसर, विद्यानगर.एन-२ मुकुंदवाडी : सिडको एन-३, जयभवानीनगर.

१२ मध्यम कन्टेनमेंट झोनदेशमुखनगर, रेणुकानगर, बारावी योजना, झांबड इस्टेट, विश्‍वरूप हॉल एरिया, शास्त्रीनगर, बालाजीनगर, सिंधी कॉलनी, हनुमाननगर, ज्योतिनगर, ज्ञानेश्‍वर कॉलनी, एसटी कॉलनी-ठाकरेनगर.

६ मायक्रो कन्टेनमेंट झोननाथपुरम सोयायटी, आदित्य नगर, कासलीवाल विश्‍व, खिवंसरा पार्क, पुंडलिकनगर गल्ली-५, पुंडलिकनगर गल्ली - १०.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या