शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ३२६ कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:18 IST

Corona Virus: जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ७३७ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देउपचारानंतर ५८१ रुग्णांना सुटी  जिल्ह्यात ५,२८४ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ३२६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५८१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्णांचा, अन्य जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ७३७ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,०९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ३२६ नव्या रुग्णांत शहरातील १२१, तर ग्रामीण भागातील २०५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १९५ आणि ग्रामीण भागातील ३८६ अशा ५८१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना आमसरी, सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, नूर कॉलनी, सिल्लोड येथील ४२ वर्षीय पुरुष, फतियाबाद येथील ६० वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडीतील ६८ वर्षीय पुरुष, पाडळी, पैठण येथील ५१ वर्षीय पुरुष, किराडपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ८५ वर्षीय महिला, शेळगाव, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, मोंढा तांडा, कन्नड येथील ४० वर्षीय पुरुष, बजाजनगरातील ३२ वर्षीय महिला, भीमनगर-भावसिंगपुरा येथील ७३ वर्षीय महिला, शरणापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळवाडी, पैठण येथील ३१ वर्षीय पुरुष, एन-८ येथील ८१ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ४१ वर्षीय पुरुष, बन्सीलालनगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि जळगाव येथील ६० वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, नाशिक जिल्ह्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर ५, बीड बायपास ८, शिवाजीनगर २, गारखेडा परिसर १, राजाबाजार १, एन-६ येथे १, विजयनगर १, जवाहर कॉलनी १, आकाशवाणी १, कांचनवाडी १, राजीवनगर २, अमृतसाई प्लाझा १, पुष्पनगरी १, सिंधी कॉलनी २, मयूरपार्क १, एन-९ येथे १, पोलीस क्वाॅर्टर, मिलकॉर्नर १, हर्सूल २, गणेशनगर १, एस. टी. कॉलनी १, समर्थनगर १, संतोषीमातानगर १, जयभवानीनगर ३, मुकुंदवाडी २, पडेगाव ३, एन-१२ येथे १, एन-८ येथे ५, एन-७ येथे १, ज्योतीनगर १, संतानगर १, चिकलठाणा एमआयडीसी ४, हमालवाडा १, भूषणनगर १, एकतानगर १, भाग्यनगर १, एसआरपीएफ कॅम्प १, कटकट गेट १, उस्मानपुरा १, एन-१३ येथे १, न्यू उस्मानपुरा १, जिन्सी १, विद्युत कॉलनी १, अन्य ५२.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ४, सिल्लोड १, नागापूर, ता. कन्नड १, नायगाव १, ममनापूर, ता. खुलताबाद १, कमलापूर १, कोहिनूर पार्क हाऊसिंग सोसायटी १, वडगाव कोल्हाटी १, पिसादेवी ४, सातारा गाव १, आवडे उंचेगाव, ता. पैठण १, खुलताबाद १, दुर्गानगर, वैजापूर २, कन्नड १, अन्य १८४.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद