शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

शेकडो दिंड्या व वारकऱ्यांनी कोरोनाच्या संकटाला झुगारून केली षष्ठी वारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 18:45 IST

निश्चितच  दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरीही नाथांच्या श्रध्देवर आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी नाथ समाधिवर नतमस्तक होत वारी पूर्ण केली.

ठळक मुद्देशेकडो दिंड्या व वारकरी आज पैठण शहरात दाखल झाले. दिंड्या पैठण शहरालगतच्या गावात मुक्कामी

पैठण : 

 ‘देह जावो अथवा राहो।   पांडुरंगी दृढ भावो।।   चरण न सोडी सर्वथा।    तुझी आण पंढरीनाथा।।

या संत नामदेवांच्या अभंगा प्रमाणे कोरोनाच्या संकटाला झुगारून शेकडो दिंड्या व वारकरी आज पैठण शहरात दाखल झाले. निश्चितच  दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरीही नाथांच्या श्रध्देवर आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी नाथ समाधिवर नतमस्तक होत वारी पूर्ण केली. राज्य भरातील शेकडो दिंड्या पैठण पासून काही अंतरावर येऊन ठेपल्या नंतर प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द केली. यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून आलेल्या दिंड्यांना  परत फिरताना जड गेले, प्रशासनाच्या आवाहना नंतर विविध दिंड्यातील हजारो वारकरी परत फिरले मात्र नाथषष्ठी वारीसाठी  दिंडीची वारी चुकू नये म्हणून मोजक्या वारकऱ्यासह दिंडी चालक महाराजांनी षष्ठी वारी पूर्ण केली.

दिंड्या पैठण शहरालगतच्या गावात मुक्कामी....पैठण शहरात दिंड्याना राहुट्या फड टाकून मुक्काम करण्यास प्रशासनाने मनाई केल्याने वारकऱ्यांच्या दिंड्या पैठण पासून काही अंतरावर असलेल्या विविध गावात मुक्कामी थांबल्या होत्या. आज सकाळी पुन्हा या दिंड्यातील वारकरी पैठण कडे मार्गस्थ झाले. दरम्यान पैठण शहरात ठराविक कालावधीने मोजक्या वारकऱ्यासह दिंड्या पैठण शहरात दाखल होत होत्या. टाळ मृदंगाचा खणखणाट, हातात भगवा ध्वज, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखातून भानुदास एकनाथ असा जयघोष करीत छोट्या छोट्या दिंड्या नाथमंदिरात दर्शनासाठी दाखल होत होत्या.

दर्शन होताच  गावाकडे रवाना....पैठण शहरात मुक्काम करण्यास मनाई असल्याने  दिंड्यांतील वारकऱ्यांना मंदिर प्रदक्षिणा व दर्शन झाल्यानंतर परत फिरावे लागले दिंडीचे दर्शन होई पर्यंत त्यांची वाहने कावसानकर स्टेडियमवर पोहचत होती. दर्शन झाल्यानंतर वारकरी स्टेडियमवर जाऊन आपल्या वाहनाने गावाकडे परत जात होते.

लक्ष्मीबाईची पूजा......संत एकनाथ महाराजांनी बहीन मानलेल्या लक्ष्मीआईची पूजा परंपरे नुसार आज नाथवंशजाच्या हस्ते करण्यात आली. नाथषष्ठी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी लक्ष्मीआईस नाथवंशजांनी साकडे घातले. लक्ष्मीआईची पूजा  सुप्रिया गोसावी , मनवा पुष्कर महाराज गोसावी, अनुराधा गोसावी , संस्थानाधिपती हभप रावसाहेब महाराज गोसावी , हरीपंडित गोसावी , श्रेयस गोसावी , पुष्कर महाराज गोसावी , विशाल देवा दाणी , परीक्षित वैद्य , भास्कर देवा देशपांडे आदिंनी केली.

नाथवंशजाकडून षष्ठीचे निमंत्रण......आज नाथवंशजांच्या वतीने षष्ठीसोहळ्यात सहभागी व्हावे म्हणून पांडुरंग भगवंतास अक्षत ( निमंत्रण) दिले गेले. याचप्रमाणे षष्ठीतील मानकरी नाथोपाध्ये,  संतकवी, अमृतराय संस्थान, भगवान गड, हभप अंमळनेरकर महाराज,  यांना ही नाथवंशजांकडून अक्षत देऊन निमंत्रण देण्यात आले.

विविध शासकीय कार्यालये यात्रा मैदानात......वारकर्यांना सेवा सुविधा देण्यासाठी यात्रा परिसरात नगर परिषदेने कार्यालय हलविले आहे या कार्यालयातून सर्व सुत्रे हालविण्यात येत आहेत, तात्पुरते अस्थायी पोलिस कार्यालय सुध्दा यात्रा मैदानात स्थलांतरीत करण्यात आले आहे.  आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा मैदानात दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याcultureसांस्कृतिक