शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

Corona Virus : 'रुग्णसंख्येत घट; पण मृत्युसत्र थांबेना'; औरंगाबादेत कोरोना मृत्युदर राज्यापेक्षा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 12:40 IST

Corona Virus : दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देशहरापेक्षा ग्रामीण मृत्युदर अधिक

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे खाली आली आहे. मात्र, तीन महिन्यांपासून कोरोनामुळे रोज रुग्णांचा बळी जात आहे. दररोज १५ ते २५ रुग्णांचा मृत्यू होत असून, मृत्युसत्र काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. या सगळ्यात राज्यापेक्षा औरंगाबादेत कोरोनाचा मृत्युदर अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. (Corona mortality rate in Aurangabad is higher than the state ) 

औरंगाबादेत महिनाभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आलेख कमालीचा घसरला आहे. रोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत होते. परंतु, आता ही संख्या तीनशेखाली आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरू आहे. औरंगाबादेत शनिवारी कोरोना रुग्णांचा मृत्युदर थेट १०.०८ टक्के राहिला. या सगळ्या परिस्थितीमुळे औरंगाबादेतील मृत्युदर हा राज्यापेक्षा अधिक झाला. मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. मृत्यूची ही स्थिती दूर होण्यासाठी रुग्णांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यावर आजार अंगावर काढता कामा नये; परंतु अनेक रुग्ण उपचारांसाठी वेळीच दाखल होत नाही. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठले जाते. अशा परिस्थितीत मृत्यूचा धोका वाढतो. लक्षणे दिसल्यावर वेळीच रुग्णालयात दाखल झाल्यास कोरोनामुक्त होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

शहरापेक्षा ग्रामीण मृत्युदर अधिकशहरापेक्षा ग्रामीण भागाचा मृत्युदर अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत ग्रामीण भागांतील रुग्णांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी थेट शहरात येण्याची वेळ ओढावत आहे.

कोरोनाचा रोजचा मृत्युदर२३ मे - ६.१० टक्के२४ मे - ५.२१ टक्के२५ मे - ३.५३ टक्के२६ मे - ५.३४ टक्के२७ मे - ४.०१ टक्के२८ मे - ५.८२ टक्के२९ मे - १०.०८ टक्केराज्याचा मृत्युदर - २.६ टक्के

औरंगाबाद शहराची स्थितीएकूण रुग्ण - ८५, ९५०कोरोनामुक्त - ८३, १४१मृत्यू - १,८४१मृत्युदर - २.१४ टक्के

औरंगाबादेतील ग्रामीण स्थितीएकूण रुग्ण - ५६, ३३७कोरोनामुक्त - ५१,९१६मृत्यू - १,३३५मृत्युदर - २.३६ टक्के

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद