शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : औरंगाबादेत आयसीयूतील मॉनिटर आला कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 09:25 IST

Corona Virus : कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना वॉर्डातील विविध वैद्यकीय उपकरणांवर, फरशीवर कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती असते.

ठळक मुद्देआता आयसीयू, वॉर्ड, वैद्यकीय उपकरणांची कोरोना टेस्टघाटीतील ६० ठिकाणचे घेतले सॅम्पल

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील आयसीयूतील माॅनिटर कोरोना पाॅझिटिव्ह आला...तुम्ही म्हणाल काहीही..पण हो...कोरोना टेस्ट फक्त संशयित रुग्णांची म्हणजे माणसांचीच होते, असा समज असेल. मात्र, खबरदारी म्हणून घाटीत वाॅर्ड, आयसीयूतील ६० ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या तपासणीत फक्त एका माॅनिटरच्या सरफेसवर कोरोनाचा विषाणू आढळून आला.

कोरोनाने १४ महिन्यांपासून थैमान घातले आहे. साधी सर्दी झाली, खाेकला जाणवला की कोरोनाचा संशय व्यक्त केला जातो. तेव्हा कोरोना झाला की नाही, याचे निदान होण्यासाठी संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतो. अँटिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर तपासणीद्वारे संशयित पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, याचे निदान केले जाते. हीच पद्धत आता रुग्णालयातील वॉर्ड, आयसीयू आणि रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांसाठी राबविली जात आहे. रुग्णांना उपचारादरम्यान खोकला, शिंकाचा त्रास असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना वॉर्डातील विविध वैद्यकीय उपकरणांवर, फरशीवर कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती असते. यादृष्टीने रुग्णालयांत स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जातो. यापूर्वी ऑपरेशन थिएटरचे (ओटी) वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत असे. एखादा संसर्गित रुग्ण आला तर ओटी बंद करून निर्जंतुकीरण, तपासणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावात अगदी असेच वॉर्ड, आयसीयूच्या बाबतीत खबरदारी घेतली आहे. घाटी रुग्णालयाने ६० ठिकाणचे नमुने घेत त्यांची कोरोना तपासणी केली. तेव्हा त्यात केवळ एका उपकरणाचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. व्हेंटिलेटर कोरोना निगेटिव्ह आल्याचेही घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अशाप्रकारे खासगी रुग्णालयांमध्येही तपासणी होत असल्याचे सांगण्यात आले.

आरटीपीसीआर तपासणीआयसीयू, वॉर्डातून ६० नमुने गोळा करण्यात आले होते. सर्व नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. फक्त एका आयसीतील माॅनिटर क्रमांक-२ पाॅझिटिव्ह आला. व्हेंटिलेटर निगेटिव्ह आला आहे. स्वच्छतेवर भर दिला जात आहे. यात आरटीपीसीआर तपासणीच करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच दिली जाईल.

-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद