शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : दिलासादायक ! औरंगाबाद जिल्हा डेंजर झोनच्या बाहेर; पण काळजी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:33 IST

कोरोना रुग्णसंख्या आणि चाचण्या, मृत्युदर रोखण्यासह आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व यंत्रणेने परिश्रम घेतले.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन वितरणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडेलॉकडाऊन निर्बंधात शिथिलता येऊन सर्व अर्थकारण पूर्वपदावर होण्याची शक्यता

औरंगाबाद : कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असल्याने सध्या येथील परिस्थिती डेंजर झोनच्या बाहेर आहे. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनासोबत व्हिडिओ कॉन्फन्सिंगवरून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

कोरोना रुग्णसंख्या आणि चाचण्या, मृत्युदर रोखण्यासह आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व यंत्रणेने परिश्रम घेतले. तसेच नागरिकांनी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध आजवर बऱ्यापैकी पाळले. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊन निर्बंधात शिथिलता येऊन सर्व अर्थकारण पूर्वपदावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, टीम औरंगाबादमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व बाबी समजून घेतल्या. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये कोरोना नियंत्रणासाठी चांगले काम होत आहे. याचा फायदा लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्यासाठी होऊ शकतो. परंतु सध्या त्याबाबत काही निर्णय होणार नाही, नागरिकांना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले नियम पाळून निर्धारीत वेळेतच व्यवहार करावे लागतील. जिल्हा परिषद, मनपा, पोलीस, महसूलच्या यंत्रणेसह आरोग्य विभागाने फ्रंटलाईनवर काम केले. त्यामुळे चांगले परिणाम हाती आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

अ‍ॅम्फोटेरेसिन-बी मोफत मिळणार नाहीम्युकरमायकोसिसच्या रुग्णांना उपचारासाठी लागणारे अ‍ॅम्फोटेरेसीन-बी हे इंजेक्शन खासगी रुग्णालयांना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. बुधवारी काही इंजेक्शन सिग्मा हॉस्पिटलला देण्यात आले. रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही. पारदर्शकपणे याचे वितरण करण्यात येईल, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या आहेत. यावर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण असणार आहे. एका रुग्णाला दिवसभरात तीन इंजेक्शनची गरज पडते. याबाबत हॉस्पिटलची मागणी जशी येईल तसे दिले जाईल. सिव्हिल हॉस्पिटलला रक्कम भरून खासगी हॉस्पिटल्सना ती इंजेक्शन घ्यावे लागतील. त्यानंतर रुग्णालयाने रुग्णाकडून इंजेक्शनची तेवढीच रक्कम घ्यायची. इंजेक्शनची किंमत सरकारी नियमानुसारच असेल. मोफत इंजेक्शन मिळणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद