शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

corona virus : दिलासा ! जिल्ह्यात ४५ दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या एक हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:59 IST

सध्या जिल्ह्यात १२,४९८ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देजिल्ह्यात मंगळवारी ९५८ रुग्णांची वाढ, ४२ मृत्यूउपचारानंतर १,४०९ रुग्णांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांनंतर मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या हजाराखाली आली. दिवसभरात ९५८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४०९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २६ आणि अन्य जिल्ह्यांतील तब्बल १६ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १४ मार्च रोजी पहिल्यांदा हजारांवर कोरोना रुग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर रोज हजार ते दीड हजारांदरम्यान रुग्णांची भर पडत गेली. यात काही दिवस रुग्णसंख्या २ हजारांजवळ गेली. परंतु गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या १२,४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख २० हजार ५६६ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ५ हजार ६४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ९५८ नव्या रुग्णांत शहरातील ५०४, तर ग्रामीण भागामधील ४५४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६५९ आणि ग्रामीण भागातील ७५० अशा १,४०९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना जाधववाडी, हडको येथील ५५ वर्षीय महिला, मिल काॅर्नर येथील ७० वर्षीय पुरुष, टिळकनगर, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय पुरुष, चिस्तिया काॅलनी, एन-६ येथील २५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७४ वर्षीय महिला, गेवराई येथील ६५ वर्षीय पुरुष, मिल काॅर्नर येथील ५५ वर्षीय महिला, समतानगर येथील ६० वर्षीय महिला, सिल्लोड येथील २८ वर्षीय पुरुष, पिंपरी येथील ७० वर्षीय महिला, एन-८ येथील ६३ वर्षीय महिला, दत्तनगर, वैजापूर येथील ६३ वर्षीय महिला, पावरी सोयगाव येथील एक महिन्याचा मुलगा, डाभरूल तांडा, पैठण येथील ७३ वर्षीय पुरुष, चौका येथील ८० वर्षीय पुरुष, बनोटी तांडा येथील ७० वर्षीय पुरुष, मोहरा, कन्नड येथील ५६ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ६० वर्षीय महिला, वाळूज येथील ३२ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७० वर्षीय महिला, वाहेगाव डोमनी, गंगापूर येथील महिला, लाडसावंगी येथील ५५ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ५६ वर्षीय महिला, पडेगाव येथील ५४ वर्षीय महिला, क्रांतीचौक येथील ८६ वर्षीय महिला आणि परभणी जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, नांदेड जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ७१ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, ६४ वर्षीय पुरुष, ६९ वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ६ वर्षीय बालिका, बुलढाणा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, लातूर येथील ८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णएन-९, सिडको २, एन-१, सिडको १, एन-३, सिडको-१, एन-७, सिडको ४, एन-१३ येथे १, एन-४, सिडको ३, एन-६, सिडको ४, एन-१२, हडको १, एन-११, हडको ५, एन-५, सिडको ३, एन-८, सिडको ६, एन-२ सिडको १, बीड बायपास परिसर ९, कैलासनगर १, रेल्वे स्टेशन परिसर ३, व्हिजन सिटी १, कांचनवाडी ९, नक्षत्रवाडी २, भानुदासनगर ३, मुकुंदवाडी ७, गोकुळनगर १, हर्सूल १७, मयूरपार्क १३, कृष्ण मंगल कार्यालय १, जटवाडा रोड परिसर ३, सातारा परिसर १६, मित्रनगर १, मिटमिटा १, म्हाडा कॉलनी ३, साकारनगर १, जय भवानीनगर ८, रामनगर २, न्यू हनुमाननगर ४, संत तुकोबानगर -१, विश्रांतीनगर १, अंबिकानगर १, इंदिरानगर ३, महालक्ष्मी चौक १, चिकलठाणा ६, गोकुळ १, धूत हॉस्पिटल परिसर १, सिंधी कॉलनी २, आकाशवाणी १, उल्कानगरी ५, एस.टी. कॉलनी १, श्रीरामनगर १, बाळकृष्णनगर १, स्पदंननगर १, रामनगर २, जवाहर कॉलनी २, शिवेश्वर कॉलनी १, सेवन हिल १, शहानुरवाडी ३, गारखेडा परिसर १३, विशालनगर ११, अजिंक्यनगर १, देवानगरी १, पदमपुरा ३, शिवशंकर कॉलनी ३, कल्पतरू हौ. सौ १, बालाजीनगर १, पुंडलिकनगर १, शिवाजीनगर २, बंजारा कॉलनी १, साईनगरी १, ज्योतीनगर १, प्रतापनगर १, उस्मानपुरा २, मयूरबन कॉलनी २, शंभूनगर १, न्यायनगर १, एकनाथनगर १, कार्तिकनगर १, मोहन टॉकीज परिसर १, जाधववाडी ३, छत्रपतीनगर १, नारेगाव ३, प्रकाश नगर १, पिसादेवी ३, भावसिंगपुरा १, शिवाजी नगर १, हिमायतबाग १, रोशन गेट १, जयसिंगपुरा १, रेणुकानगर २, राजनगर १, देवळाई परिसर २, म्हस्के पेट्रोल पंप १, कासलीवाल मार्वल २, पेशवेनगर १ आर. जे. स्कूल परिसर १, राजगुरूनगर १, शास्त्रीनगर १, खडकेश्वर २, चाऊसनगर १, खादी रोड परिसर १, दिशानगरी १, विजयंत नगर १, पेठेनगर १, भीमनगर २, रचनाकार कॉलनी १, शेंद्रा २, मकसूद कॉलनी १, श्रीकृष्णनगर १, लाडसावंगी १, अयोध्या नगर १, पैठण रोड परिसर १, भारतनगर १, भगतसिंगनगर १, सिव्हिल हॉस्पिटल १, पडेगाव १, अन्य २२८.

ग्रामीण भागातील रुग्णपवननगर, पैठण १, पैठण ४, रांजणगाव १, वाळूज ३, वैजापूर २, बजाजनगर ११, सिडको महानगर-१ येथे १, घानेगाव १, लाडगाव १, सिल्लोड ४, कन्नड ३, महाल पिंप्री १, शेवगाव १, चिंचोली १, गंगापूर १, लिंबेजळगाव ६, फुलंब्री ३, तिसगाव १, चौका १, खुलताबाद १, भडगाव १, रहिमाबाद १, अब्दीमंडी १, माळीवाडा १, वडगाव १, अन्य ४०२.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या