शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

Corona Virus : दिलासा...२ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या पाचशेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:46 IST

Corona Virus : सोमवारी ४२३ रुग्णांची वाढ, ३९ रुग्णांचा मृत्यू 

ठळक मुद्देउपचारानंतर जिल्ह्यात ६११ कोरोनामुक्त सध्या जिल्ह्यात ६,३७६ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल २ महिन्यांनंतर कोरोनाची दररोजची रुग्णसंख्या सोमवारी पाचशेखाली आली. दिवसभरात ४२३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६११ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर गेल्या २४ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २६ आणि अन्य जिल्ह्यांतील १३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात ८ मार्च रोजी ३८८ कोरोना रुग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी ५५० रुग्णांची वाढ झाली. तेव्हापासून रुग्णसंख्या पाचशेवर होती. दररोजची रुग्णसंख्या २ हजारांजवळही गेली होती; परंतु काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख घसरत आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे; परंतु रोजचा मृत्यूदर वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ४६७ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २८ हजार १४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,९४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ४२३ नव्या रुग्णांत शहरातील १७२, तर ग्रामीण भागामधील २५१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १३० आणि ग्रामीण भागातील ४८१ अशा ६११ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील ४३ वर्षीय पुरुष, भागणी, गंगापूर येथील ६० वर्षीय पुरुष, कोबापूर,गंगापूर येथील ४२ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६९ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ८६ वर्षीय पुरुष, हडको, एन-१३ येथील ५४ वर्षीय पुरुष, विद्यापीठ परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, धानोरा, सिल्लोड येथील ६२ वर्षीय पुरुष, संग्रामनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, दौलताबाद येथील १०१ वर्षीय महिला, कारकीन, पैठण येथील ४५ वर्षीय महिला, पैठण येथील ६१ वर्षीय पुरुष, खंडाळा येथील ४४ वर्षीय पुरुष, मोहरा, कन्नड येथील ५८ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ५० वर्षीय महिला, गंगापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, गोळेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, जख्मतवाडी, गंगापूर येथील ५४ वर्षीय पुरुष, चित्तेपिंपळगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, अंधानेर, कन्नड येथील ७६ वर्षीय महिला, निलजगाव तांडा, पैठण येथील ५३ वर्षीय पुरुष, कासोद, सिल्लोड येथील ७७ वर्षीय पुरुष, प्रकाशनगर, बिडकीन येथील ५९ वर्षीय पुरुष, धूपखेडा येथील ५८ वर्षीय पुरुष, हिराडपुरी, पैठण येथील ७३ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ४४ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ८५ वर्षीय महिला, ६३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४७ वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला,४५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, र्हिगोली जिल्ह्यातील ४० वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ४० वर्षीय पुरुष, परभणीतील ७९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद परिसर २, हर्सूल १, कुशलनगर १, कांचननगर १, ढिल्लन रेसिडेन्सी, कांचनवाडी १, म्हाडा कॉलनी १, बीड बायपास १, शिवाजीनगर २, सातारा परिसर ४, कासलीवाल मार्बल २, शहाबाजार १, क्रांती चौक १, कोहिनूर कॉलनी १, दिल्ली गेट १, हर्सूल जेल २, जय भवानीनगर १, न्यू हनुमाननगर १, एन-९ येथे ३, मुकुंदवाडी ३, एन-८ येथे १, नवनाथनगर १, हिमायतबाग १, भानुदासनगर ३, आय. एच. एम. बॉईज हॉस्टेल, हडको कॉर्नर १, महेशनगर १, नंदनवन कॉलनी १, उत्तरानगरी १, रामनगर १, एन-४ येथे १, अन्य १३०

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १, पाटोदा १, पिसादेवी १, हर्सुल सावंगी १, रोटेगाव, ता.वैजापूर १, रांजणगाव पोळ ता. गंगापूर २, वाळूज, गंगा कॉलनी १, इंदिरानगर, पंढरपूर १, एम.आय.डी.सी. चिकलठाणा १, अन्य २४१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद