शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोविड सेंटरचे ऑक्सिजन सिलिंडर रोखले; निवासी इमारतीत सेंटर सुरू केल्याने रहिवाशी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:41 IST

corona virus : या पार्श्वभूमीवर डॉ. उदयसिंग राजपूत यांनी पुंडलिकनगर रस्त्यावरील दुर्गानंद हाईट्स या इमारतीत सुभाश्री हॉस्पिटल आणि कोविड सेंटर सुरू केले आहे.

ठळक मुद्देपुंडलिकनगर रस्त्यावरील सुभाश्री हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील घटनातेथील ‘आयसीयू’मध्ये सध्या १२ रुग्ण कोविड पॉझिटिव्हचे उपचार घेत आहेत.

औरंगाबाद : निवासी इमारतीत कोविड सेंटर सुरू केल्यामुळे संतप्त रहिवाशांनी त्या इमारतीची लिफ्टच बंद केली. यामुळे गंभीर रुग्णांसाठी आणलेले ऑक्सिजन सिलिंडर वरच्या मजल्यावर पोहोचविणे शक्य होत नव्हते. हा प्रकार पाहून रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी तिकडे धाव घेऊन उभयतांची समजूत काढली व लिफ्ट सुरू करून सिलिंडर वरती नेणे शक्य झाले.

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय शेजारील विविध जिल्ह्यांचे रुग्णही उपचारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिणामी, शहरातील रुग्णालये फुल्ल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. उदयसिंग राजपूत यांनी पुंडलिकनगर रस्त्यावरील दुर्गानंद हाईट्स या इमारतीत सुभाश्री हॉस्पिटल आणि कोविड सेंटर सुरू केले असून, तेथील ‘आयसीयू’मध्ये सध्या १२ रुग्ण कोविड पॉझिटिव्हचे उपचार घेत आहेत.या इमारतीमधील १४ फ्लॅटधारकांनी आज सकाळी थेट उद्‌वाहकच (लिफ्ट) बंद केले. ही बाब डॉ. राजपूत यांना समजल्यावर त्यांनी लिफ्ट सुरू करण्याची रहिवाशांकडे वारंवार विनंती केली. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शिवाय वरच्या मजल्यावरील ‘आयसीयू’मध्ये दाखल १२ रुग्णांचा ऑक्सिजन संपत आला होता. ऑक्सिजन सिलिंडर तातडीने वरच्या मजल्यावरील ‘आयसीयू’मध्ये नेणे गरजेचे होते. मात्र, लिफ्ट बंद असल्यामुळे ते तातडीने वर पोहोचवणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते. शेवटी डॉक्टरांनी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांना सांगितला. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार व्ही.जी. घोडके आणि अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णांचा जीव महत्त्वाचा आहे, असे सांगून रहिवाशांची समजूत काढली. त्यानंतर लिफ्ट चालू करण्यात आली व ऑक्सिजन सिलिंडर ‘आयसीयू’मध्ये नेणे शक्य झाले.

लहान मुले- वृद्धांना संसर्ग होण्याची भीतीनिवासी इमारतीत कोविड सेंटर सुरू झाल्यापासून तेथील रहिवाशांची चिंता वाढली आहे. रुग्णांचे नातेवाईक व्हरांड्यात आणि पायऱ्यावर, पोर्चमध्ये झोपतात. त्यांच्यामुळे आपल्या घरातील लहान मुले, वृद्धांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा आरोप करीत रहिवाशांनी या कोविड सेंटरवरच आक्षेप घेतला आहे. निवासी भागात या सेंटरला परवानगी मिळालीच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित करीत तेथील संतप्त रहिवाशांनी इमारतीची लिफ्ट बंद करून ठेवली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद