शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : औरंगाबादकरांना मोठा दिलासा; कोरोनाबाधीत प्राध्यापिकेच्या घरातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:50 IST

यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला असून शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याची पुष्टी मिळाली आहे.

ठळक मुद्देसोबतच्या प्राध्यापिकेचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला आहेप्राध्यापिकेच्या घरातील सासू, वाहनचालक आणि कुक निगेटिव्ह

औरंगाबाद : शहरातील एका खाजगी रुग्णालयात रशिया येथून परतलेल्या प्राध्यापिकेवर कोरोनाची लागण झाल्याने उपचार सुरु आहेत. उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात सोबतच्या एका प्राध्यापिकेचा अहवाल  निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची सासू, वाहनचालक आणि कुक यांचा अहवाल सुद्धा आज निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली आहे. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला असून शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याची पुष्टी मिळाली आहे.

कोरोनाची लागण झालेलीं प्राध्यापिका रशिया येथून दिल्लीमार्गे शहरात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर प्राध्यापिकेचा वावर असलेल्या ठिकाणी आरोग्य पथकाने युद्ध पातळीवर सर्वक्षण केले होते. यावेळी त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यात त्यांच्या घरातील सासू, वाहनचालक, स्वयंपाकी यांचा अहवाल आज निगेटिव्ह आला. यापूर्वी त्यांच्या जवळच्या एका प्राध्यापिकेचा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला होता. प्राध्यापिकेच्या जवळच्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे .तसेच वैद्यकीय तज्ञांनी शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

प्राध्यापिकेचा अहवाल २ दिवसांत येणारखाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या प्राध्यापिकेची प्रकृती स्थिर आहे. या प्राध्यापिकेचे गेल्या २४ तासांत २ स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल २ दिवसांत मिळण्याची शक्यता आहे, असे खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णालयातून सुटी देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. औषधोपचारामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे हे अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस