शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

मोठा दिलासा ! ऑक्सिजनसाठी आर. एल. स्टील कंपनीचे जिल्हा प्रशासनाकडून अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 13:42 IST

corona virus अधिग्रहीत केलेला उत्पादक ऑक्सिजन प्लांट स्थळावरून शहरातील अथवा जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजनचा पुरवठा करेल.

ठळक मुद्देकोविडबाधित रुग्णांना व अशा रुग्णांवर उपचार करणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर यांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागत आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनचा आकस्मिक साठा २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील रुग्णालये, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन पैठण तालुक्यातील चितेगाव येथील मे. आर. एल. स्टील कंपनी यांना तत्काळ ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी काढले आहेत.

दरम्यान, अधिग्रहीत केलेला उत्पादक ऑक्सिजन प्लांट स्थळावरून शहरातील अथवा जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजनचा पुरवठा करेल. या कामात कोणताही निष्काळजीपणा अथवा दुर्लक्ष होणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी बजावले आहे. पथकातील सनियंत्रण अधिकारी म्हणून प्रादेशिक पर्यटन महामंडळाचे उपसंचालक श्रीमंत हारकर व सहआयुक्त, औषधे अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद यांच्याशी समन्वय ठेवून वेळोवेळी अहवाल सादर करतील.

मागणी वाढली...कोविडबाधित रुग्णांना व अशा रुग्णांवर उपचार करणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर यांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागत आहे. मार्च महिन्यात वाढलेली ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता, भविष्यात औरंगाबाद जिल्ह्यात व औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजन (जम्बो सिलिंडरच्या स्वरुपात) आकस्मिक आवश्यकतेप्रमाणे तत्काळ उपलब्ध होणे अनिवार्य आहे. कोविड - १९ प्रथम लाटेवेळी व मार्च २०२१मध्ये काहीवेळा पुरवठ्यापेक्षा ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे निकडीची परिस्थिती उद्भवली होती. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनचा आकस्मिक साठा २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पथक नियुक्त...ऑक्सिजन उत्पादकांनी जम्बो सिलिंडरचा वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार व जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तत्काळ पुरवठा करावा, यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मनोज तलवारे, जि. द. जाधव, शी. गो. देशमुख, डी. डी. महालकर, बी. डी. राठोड यांचा या पथकात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद