शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus in Aurangabad : शहराची पुन्हा कोरोना मृत्यूवर मात; जिल्ह्यात ४३ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 12:32 IST

Corona virus in Aurangabad: जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचा आलेख घसरला असून, जिल्हा मृत्यूच्या संकटापासून दूर जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील एक, अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : शहराने मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली. दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील एक आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, सध्या ४६६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचा आलेख घसरला असून, जिल्हा मृत्यूच्या संकटापासून दूर जात आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात शहरात ११ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ४८० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ६२ अशा ७६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४२३ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना, म्हस्की, वैजापूर येथील ४५ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णस्वस्तिकनगर १, जाधववाडी १, एन-३, सिडको १, कैसर कॉलनी १, स्टेशन रोड फॉरेस्ट कॉलनी २, पन्नालालनगर १, गारखेडा परिसर १, एन-१२, हडको १, घाटी १, सातारा परिसर १

ग्रामीण भागातील रुग्णसिडको महानगर-१ येथे २, दौलताबाद १ यासह विविध गावांमध्ये २९ कोरोना रुग्णांची भर पडली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या