शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : औरंगाबादच्या सीमा बंद; ई- पास शिवाय कुणालाही परजिल्ह्यात जाता-येता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 15:34 IST

corona virus : e-pass require for travelling लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार कोणत्याही नागरिकांना विना परवानगी (अधिकृत पास) परजिल्ह्यात अथवा परराज्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावेआवश्यकता नसेल तर प्रवास टाळावा,पोलीस आयुक्तांचे आवाहन

औरंगाबाद : राज्यात गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू झाल्यामुळे नागरिकांना विना पास परजिल्ह्यात अथवा परराज्यांत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक प्रकरणात शहर पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच ई पास सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार कोणत्याही नागरिकांना विना परवानगी (अधिकृत पास) परजिल्ह्यात अथवा परराज्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना महत्त्वाच्या कारणासाठी परजिल्ह्यात जाण्यासाठी ई पास उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गतवर्षीप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून ई पासची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले. या करिता काही निकष असतील. विशिष्ट कारणासाठीच नागरिकांना परजिल्ह्यात जाण्याची परवानगी असेल. आयुक्त म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ; मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे, अथवा आवश्यकता नसेल तर प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

असा करा ई-पाससाठी अर्ज अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद