शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

CoronaVirus in Aurangabad : शहरातील ६ तर ग्रामीण भागातील ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू, ७४८ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 12:10 IST

Corona virus in Aurangabad: जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ७७२ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २३ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात ७,१८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेतमंगळवारी दिवसभरात १,००४ रुग्णांना उपचारानंतर सुट्टी

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ७४८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,००४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत २९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद शहरातील ६, ग्रामीण भागातील ११ आणि अन्य जिल्ह्यांतील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,१८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ७७२ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २३ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २६८, तर ग्रामीण भागातील ४८० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५५० आणि ग्रामीण भागातील ४५४ अशा १,००४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.

उपचार सुरू असताना गंगापूर येथील ८५ वर्षीय महिला, समतानगर येथील ७० वर्षीय पुरुष, पैठण येथील ४५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, वैजापूर येतील ५५ वर्षीय पुरुष, कुतुबपुरा येथील ६६ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६८ वर्षीय पुरुष, रमानगर येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ५६ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६१ वर्षीय महिला, ७४ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, एन-८ येथील ४८ वर्षीय महिला, ढाकेफळ येथील ६१ वर्षीय पुरुष, बीड बायपास परिसरातील ६० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७८ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय महिला, ६१ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ७२ वर्षीय महिला, ६६ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद परिसर १, बीड बायपास २, मुकुंदवाडी ४, गारखेडा ५, सातारा परिसर ४, देवळाई रोड २, बीड बायपास २, शिवनगर १, नंदनवन कॉलनी २, भगीरथनगर १, मिलट्री हॉस्पिटल २, काला दरवाजा २, मित्रनगर १, शहागंज १, म्होसाबानगर २, हर्सूल २, रेणुका माता मंदिर, हडको १, जाधववाडी ४, न्यू बालाजीनगर १, पुंडलिकनगर २, पीरबाजार १, श्रीजी हॉस्पिटल १, शिवाजीनगर ४, छत्रपतीनगर ४, गजानननगर १, श्रीकृष्णनगर १, राजनगर २, भावसिंगपुरा १, समर्थनगर १, जयभवानीनगर ५, सुधाकरनगर १, पडेगाव १, पडेगाव, सैनिक कॉलनी २, खिंवसरा पार्क, उल्कानगरी ३, शांतीपुरा, छावणी १, खोकडपुरा २, एम.आय.डी.सी चिकलठाणा १, चिकलठाणा १, न्यू गणेशनगर ४, गुरुसाक्षी सेक्टर १, ठाकरेनगर १, हनुमाननगर ३, मौलाना आझाद चौक १, संत तुकोबानगर २, प्रकाशनगर १, राजनगर १, तोरणागडनगर १, परिजातनगर १, देशमुखनगर १, गजानन कॉलनी २, न्यू विशालनगर १, शंभुनगर १, आविष्कार कॉलनी ३, अल्तमश कॉलनी १, न्यू पहाडसिंगपुरा १, मोर्या पार्क १, होणाजीनगर १, संभाजीनगर २, पवननगर १, कार्तिकनगर १, वसंतनगर १, संजयनगर १, समतानगर १, भगतसिंगनगर २, एन-१३ येथे ३ ,एन-३ येथे १, एन-९ येथे १, एन-७ येथे १, एन-८ येथे ६, एन-१२ येथे १, एन-६ येथे १, एन-१ येथे १ , एन-९ येथे ३, एन-२ येथे १, एन-१ येथे १, अन्य १३६.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ३, कासोडा (ता. गंगापूर) १, वाळून कमलापूर रोड १, हिंदुस्तान आवास, नक्षत्रवाडी १, माळीवाडा १, न्यू भारतनगर, रांजनगाव १, एकलेहरा ता.गंगापूर १, सिडको महानगर १, चिंचोली (ता.फुलंब्री) १, कांचनवाडी १, (ता.फुलंब्री) २, लोणर १, पळशी १, झाल्टा सुंदरवाडी १, पिसादेवी १, मांडकी १, घनसांवगी १, शिवार १, चोरवाघलगाव ता.वैजापूर १, हर्सूल सावंगी १, लिहाखेडी (ता. सिल्लोड) २, घाटशेंद्रा, (ता. कन्नड) १, करमाड घाटशेंद्रा (ता. कन्नड) १, अंबरनेल कायगाव टोका, (ता.गंगापूर) १, गंगापूर १, चित्तेपिंपळगाव १, गेवराई तांडा १, सिल्लोड १, अन्य ४४८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद