शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccine : लस तुटवड्याने औरंगाबादेत लसीकरण बंद; ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:46 IST

corona vaccination stopped in Aurangabad : रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या.

ठळक मुद्दे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. दुसरा डोस ८४ दिवसांनंतर घ्या, असे शासनानेच जाहीर केले. १०० दिवस उलटल्यानंतरही अनेकांना लस मिळेना. एकीकडे मोफत लसींचा प्रचंड तुटवडा असताना शहरातील खाजगी रुग्णालयांना पाहिजे तेवढ्या लसी विविध कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिक भर पडत आहे. ( Large shortage of corona vaccine in Aurangabad ) 

शहरात लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस वापरली जाते. रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या. त्यासोबतच कोव्हॅक्सिनच्यादेखील दीडशे लसी शिल्लक असून, तीही संपल्यात जमा आहे. शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात आल्या. शनिवारी ३९ केंद्रांवर अवघ्या काही तासातच लस संपल्या. ७ हजार नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्यात आला. ७०० पेक्षा अधिक नागरिकांना पहिला डोस दिला. 

डोस न घेताच माघारी फिरावे लागलेया आठवड्यांत चार दिवसानंतर महापालिकेला ८ हजार लस मिळाल्याने शनिवारी ३९ केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्याकरिता ३४ केंद्रांवर व्यवस्था केली. लस आल्याचे कळताच सकाळपासूनच केंद्रावर कुपन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. कुपन घेतल्यानंतरही काही नागरिक थेट केंद्रावर लस घेण्यासाठी दाखल झाले. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक केंद्रावर १५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. दिवसभरात साडेसहा हजार नागरिकाचे लसीकरण झाले. अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.

५५ हजार नागरिक डोसच्या प्रतीक्षेत१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ८ ते १० हजारच लस मिळत आहे. एकदा साठा मिळाल्यानंतर किमान चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागते. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या ५५ हजारहून अधिक नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद