शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच युजरनेमने दहा ठिकाणी लसीकरण; निलंबित आरोग्य नर्स आणि सेविकेची सीईओंकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 18:04 IST

लस न घेता कोविन ॲप्लिकेशनवरून लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शहरातील काही लोकांचा गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला आहे.

औरंगाबाद : बोगस लसीकरण प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपावरून शिऊर आणि मनूर (ता.वैजापूर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय नर्स आणि आरोग्य सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा बोगस लसीकरण प्रमाणपत्राशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. एकाच युजर आय.डी.वरून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दहा ते पंधरा ठिकाणी लसीकरण होते. केवळ युजर नेम आहे, म्हणून आमच्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

लस न घेता कोविन ॲप्लिकेशनवरून लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या शहरातील काही लोकांचा गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला. बोगस प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिउद्दीन शेख फहीम यांच्याकडून पैसे देऊन घेण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी डॉ.शेख यांच्यासह लसीकरण करणारे म्हणून तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका उषा आढाव आणि मनूर प्रा.आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका शहेनाज शेख यांची नावे असल्याने आरोपी करण्यात आले होते. हे प्रकरण समोर येताच मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी डाॅ. शेख यांच्यासह आरोग्य सेविकांना निलंबित केले. निलंबित आरोग्य सेविकांसह जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी नमूद केले की, एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेविका या लस टोचक म्हणून काम करतात. कोविन ॲपवर यूजर नेम म्हणून आरोग्य सेविकेचे नाव आहे. एका यूजर आयडीवरून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दहा ते पंधरा ठिकाणी लसीकरण होते. आपल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून कुणी तरी बोगस लसीकरण प्रमाणपत्र दिले आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत; मात्र आमचा दोष नसताना निलंबित केल्याने अन्याय झाल्याचे नमूद केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद