शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धडकी; यंदा धोंडे खायला जावयांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:45 IST

दर तीन वर्षांनी येणारा धोंड्याच्या महिना यंदा  १८ सप्टेंबरपासून सुरुवात होऊन १८ ऑक्टोबरला संपणार आहे.

ठळक मुद्देघरातच विष्णूची  आराधना करण्याचा सल्ला धोंड्याच्या दानाची रक्कम थेट जावयांच्या बँक खात्यात

औरंगाबाद : अधिक मासाची (धोंडा) जावयांच्या जमातीला आतुरतेने प्रतीक्षा असते. सासुरवाडीला जावयांचा नेहमीच स्वागत, सन्मान तर होतोच; पण अधिक मासातील सन्मान जरा हटकेच असतो. मुलगी व जावयांची लक्ष्मी-नारायण स्वरूपात पूजा होते. चविष्ट धोंडे खाऊ घातले जातात. लेक-जावयांची खूप इच्छा आहे येण्याची; पण कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने धडकी भरलेल्या परजिल्हा, परराज्यांतील जावई औरंगाबादमध्ये येण्यास नकार कळवत आहेत. 

दर तीन वर्षांनी येणारा धोंड्याच्या महिना यंदा  १८ सप्टेंबरपासून सुरुवात होऊन १८ ऑक्टोबरला संपणार आहे. अधिक मासात विविध धार्मिक कार्ये केली जातात. विशेषत: या काळात लेक-जावयांना मोठा मान असतो. अधिक मासात लक्ष्मी व नारायणाची आराधना केली जाते. लेक-जावयाची लक्ष्मी- नारायण स्वरूपात पूजा केली जाते. त्यासाठी दोघांना खास आमंत्रण दिले जाते. त्यांची पूजा करतात. ३३ अनारसे, बत्तासे, नारळ, सुपाऱ्या देतात. ते सर्व  चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेऊन दिवा व कुंकू लावून हे दान दिले जाते. पुरणाचा धोंडा केला जातो. काही जण हौशीने चांदी किंवा सोन्याचे धोंडेसुद्धा जावयाला देतात. साडी, कपड्यांची शेवंती सुद्धा देतात. धोंड्याचे हे महत्त्व असल्याने जावईबापू सासरी येतातच. मात्र, यंदा औरंगाबादमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व परजिल्ह्यातून आल्यावर १० दिवस  विलगीकरणात राहावे लागू शकते. यंदा जावईबापूंनी येत नसल्यान आता काय करावे, असा प्रश्न सासू-सासऱ्यांना पडला आहे. काहींनी धोंड्याच्या दानाची रक्कम थेट जावयांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे जावई शहरातच राहतात त्यांना धोंडा मिळणार आहे. यानिमित्ताने लेक, जावई, नातवंडे सारे येतात. यंदा मात्र, हे चित्र नाही. 

१६० वर्षांनी आश्विन मासात आला अधिक मासदर ३ वर्षांनी येणारा अधिक मास यंदा १६० वर्षांनंतर आश्विन मासात आला आहे. यापूर्वी २ सप्टेंबर १८६० मध्ये आश्विन मासात अधिक मास आला होता. अधिक मासात घरीच लक्ष्मी-नारायणाची आराधना करावी, अधिक मास माहात्म्य वाचावे, नारायण कवच, नारायण अस्त्र व विष्णुसहस्रनामाचे वाचन करावे.  - वे.शा.सं. देवीदास मुळे गुरुजी 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक