शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट; आता औरंगाबादेतही अँटीजन टेस्टला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:00 IST

राज्य शासनाने मंगळवारी औरंगाबाद महापालिकेला अत्यंत अत्याधुनिक अँटीजन टेस्ट करण्याची परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअँटीजन टेस्टसाठी लागणाऱ्या कीट खरेदीची मुभा शासनाने महापालिका प्रशासनाला दिली आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारने चार दिवसांपूर्वीच या अत्याधुनिक टेस्ट पद्धतीचा अवलंब केला आहे.

औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच हात-पाय पसरले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर सर्वत्र करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातही महापालिकेला अँटीजन टेस्ट करण्याची राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या टेस्टमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल अवघ्या तीस मिनिटांमध्ये प्राप्त होतो. 

मागील चार महिन्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा आकडा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचला आहे. २०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला. दररोज शहर आणि आसपासच्या परिसरात १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेची अक्षरश: झोप उडाली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना दररोज दहापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू होत आहे. केंद्र शासनाने मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सर्व शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही रुग्णांचा जीव वाचविणे अवघड झाले आहे. कोरोनासंदर्भात शासकीय यंत्रणेला यश मिळायला तयार नाही. 

दरम्यान, राज्य शासनाने मंगळवारी औरंगाबाद महापालिकेला अत्यंत अत्याधुनिक अँटीजन टेस्ट करण्याची परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत केजरीवाल सरकारने चार दिवसांपूर्वीच या अत्याधुनिक टेस्ट पद्धतीचा अवलंब केला आहे. दररोज सात हजारहून अधिक टेस्ट या पद्धतीने करण्यात येत आहेत. अँटीजन टेस्टसाठी लागणाऱ्या कीट खरेदीची मुभा शासनाने महापालिका प्रशासनाला दिली आहे. 

अँटीजन टेस्ट कशा पद्धतीने होते01.शहरात दररोज ४०० पेक्षा अधिक संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात येत आहेत. दिवसभरात जमा केलेले लाळेचे नमुने घाटी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येतात. प्राप्त झालेल्या नमुन्याचे अहवाल दुसऱ्या दिवशी सकाळी प्राप्त होतात. 02. अँटीजन टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेतले जातात. एका छोट्या मशीनवर याची तपासणी शक्य आहे. ज्या कीटवर तपासणी होते त्यावर दोन लाल रेषा दिसून आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. एकच लाल रेषा कीटवर दिसून आल्यास रुग्ण निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद