शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाने ५६ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात १,४९७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली ...

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात १,४९७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि २,३७८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत तब्बल ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील एका दिवसातील आजपर्यंतचे सर्वाधिक ४४ आणि अन्य जिल्ह्यांतील १२ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या १४,२५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ४८८ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख ८८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आजपर्यंत २,३४६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १,४९७ नव्या रुग्णांत शहरातील ६१८ तर ग्रामीण भागातील ८७९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १४६० आणि ग्रामीण भागातील ९१८ अशा २३७८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना रामपूरवाडी, कन्नड येथील ४७ वर्षीय महिला, विमानतळ परिसरातील ६४ वर्षीय महिला, पैठण येथील ९७ वर्षीय पुरुष, शिरोडी, गंगापूर येथील ५५ वर्षीय महिला, गिरनेर तांडा येथील ६५ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठण येथील ८५ वर्षीय पुरुष, गेवराई, सेरनी, सिल्लोड येथील ४० वर्षीय महिला, हर्सूल येथील ७५ वर्षीय महिला, संजयनगर, बायजीपुरा येथील ५३ वर्षीय महिला, हर्सूल येथील ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष, शाहनगर, बीड बायपास येथील ४७ वर्षीय पुरुष,पिशोर , कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, नावाबपुरा येथील ६० वर्षीय पुरुष, लक्ष्मी कॉलनी येथील ८३ वर्षीय पुरुष, आडगाव पाचोर येथील २५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, सोनारी येथील ६० वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर, चिकलठाणा येथील ३३ वर्षीय महिला, वैशालीनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, शिवूर, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, पडेगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, वैताळवाडी, सोयगाव येथील ५५ वर्षीय महिला, सिडको महानगर वाळूज येथील ६५ वर्षीय महिला, मुकुंदवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ७२ वर्षीय पुरुष, रामनगर , एन-२ येथील ५५ वर्षीय पुरुष, शिरेगाव, गंगापूर येथील ४९ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६२ वर्षीय महिला, पिंप्रीराजा येथील ७० वर्षीय महिला, हनुमंतखेडा, सोयगाव येथील ७५ वर्षीय महिला, पदमपुरा येथील ७५ वर्षीय पुरुष, लासूर स्टेशन येथील ५६ वर्षीय महिला, बाजाजनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, शांतीनगर , कन्नड येथील ५५ वर्षीय महिला, शंभूनगर येथील ६० वर्षीय पुरुष, देवळाई रोड येथील ३८ वर्षीय महिला, सुधाकरनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, जयभवानीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, समर्थनगर येथील ८५ वर्षीय पुरुष, कांचनवाडी येथील ४७ वर्षीय महिला, उस्मानपुरा येथील ७५ वर्षीय महिला, कांचनवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, नांदेड जिल्ह्यातील ७० वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ३५ वर्षीय महिला, नाशिक जिल्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणी, परभणी जिल्ह्यातील ७४ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ७९ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ३० वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, बुलढाणा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रूग्ण

औरंगाबाद ५, बीड बायपास १७, शिवाजीनगर १५, सातारा परिसर १५, गारखेडा परिसर ९, घाटी ५, पडेगाव ११, समर्थनगर ५, कांचनवाडी १४, मेल्ट्रॉन डीसीएचसी १, मिलिट्री हॉस्पिटल १, ईटखेडा ३, हर्सूल १२, मयूर पार्क ११ एन-७ येथे ११, एन-१२ येथे १, जटवाडा रोड ४, एन-४ येथे ५, गणेशनगर १, एमआयटी कॉलेजजवळ १, शहानूरवाडी ३, अक्षयदीपनगर १, जालाननगर ५, सुधाकरनगर १, नंदनवन कॉलनी ६, देवळाई चौक १, मुकुंदवाडी ५, साईनगर २, शिवकृपा कॉलनी २, एन-२ येथे ९, नाईकनगर ३, देशमुखनगर २, राजेंद्रनगर १, जाधववाडी ३, पवननगर ४, गुरू दत्तनगर २, एन-६ येथे २, स्पंदननगर १, एन-५ येथे ३, जय भवानीनगर २, सिडको ४, कैलाशनगर १, अरिहंतनगर १, वेदांतनगर ३, पद्मपुरा ३, कोंकणवाडी १, उस्मानपुरा ५, देवळाई २, रेल्वेस्टेशन १, मिलिंदनगर १, विशाल नगर १, ज्योतीनगर १, एन-३ येथे ४, स्टेशन रोड २, राहुलनगर १, पर्यटन कार्यालयासमोर १, पानचक्की १, भूषणनगर १, उल्कानगरी ७, टाऊन हॉल २, पुंडलिक नगर ८, दिल्ली गेट ४, अजब नगर २, सिटी चौक सराफा बाजार १, नारळी बाग २ भावसिंगपुरा २, पैठण गेट १, हर्सूल टी पॉइंट १, ग्रीन व्हॅली १, नारेगाव ४, समतानगर १, टी.व्ही.सेंटर ६, रामनगर ३, जय भवानीनगर २, न्यू गणेशनगर २ ठाकरेनगर ३, विश्रांतीनगर २, न्यू हनुमाननगर ५, अंबिकानगर १, राजीव गांधीनगर १, तिरुपती कॉलनी १, प्रभूनगर १, टाऊन सेंटर १, एन-९, येथे ७, मुकुंदनगर २, गजानननगर २, तोरणागडनगर १, एमआयडीसी चिकलठाणा २, परिजातनगर २, श्रध्दा कॉलनी १, विद्यानगर १, संजयनगर ५, गुरुसाक्षी हाैसिंग सोसायटी २, सानप हॉस्पीटल १, न्यू मोतीनगर १, नाथनगर ४, प्रतापनगर २, विजयनगर १, आकाशवाणी २, बालाजी नगर १, गजानन कॉलनी ८, मयूरबन कॉलनी ४, बांद्रा नगर १, गजानन मंदिर १, भारतनगर १, रिंग रोड १, भोईवाडा २, सिंधी कॉलनी ४, काबरा नगर १, चिकलठाणा २ शिवशंकर कॉलनी १, बायजीपुरा १ आदिनाथनगर १, छत्रपती हॉल हर्सूल १, म्हसोबानगर १, नवजीवन कॉलनी १, द्वारका नगर १, नवनाथनगर २, राधास्वामी कॉलनी १, एन-१३ येथे १, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर २, आरेफ कॉलनी २, म्हसोबानगर २, टिळक नगर १, आकाशवाणी १, बजरंग चौक १, पिसादेवी रोड २, व्यंकटेशनगर ४, गौतम बुद्ध नगर २, सतपालनगर २, न्यू सौजन्यनगर १, रशिदपुरा १, केंब्रीज १, ओरंगपुरा १, बेगमपुरा २, संग्रामनगर १, साईसंकेत पार्क २,बाळकृष्ण नगर १, छपत्रती नगर १, नाथप्रांगण १, म्हाडा कॉलनी सातारा परिसर १, सिव्हिल हॉस्पिटल १, सावित्रीनगर १, श्रेय नगर २, नक्षत्रवाडी ३, दशमेश नगर १, बन्सीलालनगर १, शीतलनगर १, नवीन वस्ती पद्मपुरा १, स्नेहनगर क्रांती चौक १, नागेश्वरवाडी २, ज्युब्ली पार्क १, कमलनयन बजाज हॉस्पिटल १, ज्योतीनगर १, जाधवमंडी १, गुलमोहर कॉलनी १, दर्गा रोड १, ज्ञानेश्वर नगर १, प्रगती कॉलनी १, कटकट गेट १, भारत माता नगर १, झाल्टा फाटा १, जवाहर कॉलनी ४, भवानीनगर मोंढा १, मित्रनगर १, एसबीओ शाळेसमोर २, खाराकुंआ १, पैठण गेट १, अन्य १७९

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाज नगर १३, वाळूज ६, सिडको वाळूज ३, सिडको महानगर १ येथे ८, ए.एस.क्लब ४, वडगाव १, रांजणगाव ७, माळीवाडा २, लाडगाव करमाड १, टोकी १, गंगापूर २ बेलापूर १, गांधेली १, गेवराई कुबेर २ शिवना, ता.सिल्लोड १, बिडकीन ३, पिसादेवी ४, एकतुणी ता.पैठण १, पैठण २, सावंगी ३, कोलठाण वाडी १, हळदा ता.सिल्लोड १, म्हसला १, निल्लोड, ता.सिल्लोड १, गाढे पिंपळगाव, ता.वैजापूर १, विरमगाव १, चिंचोली १, दौलताबाद १, साजापूर २ वडगाव कोल्हाटी १, तिसगाव १, वैजापूर २, रोटेगाव रेल्वे स्टेशन १, सुलतानपूर ता.पैठण २, पळसवाडी ता. खुलताबाद १, सुंदरवाडी २, दावरवाडी १, लासूर स्टेशन ता.गंगापूर १, अन्य ७८७