शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कोरोना तपासणीत चार तालुक्यातील ९ शिक्षक बाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:43 IST

दोन दिवसांत केवळ १४ टक्केच तपासणी

ठळक मुद्दे ९८०० टेस्ट बाकी : आरोग्य, शिक्षण विभागासमोर आव्हानऔरंगाबादेत १३९३ शिक्षकांची कोरोना तपासणी

औरंगाबाद : नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत १६४६ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये ८ शिक्षक आणि १ कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आले. दोन दिवसांत १४ टक्केच शिक्षकांच्या तपासण्या झाल्याने पुढील दोन दिवसांत उर्वरित ८६ टक्के म्हणजे ९ हजार ८०० तपासण्या कशा पूर्ण होतील, असा प्रश्न शिक्षण विभागासह आरोग्य विभागाला सतावत आहे.

जिल्ह्यात ८८१८ शिक्षक, २६६५ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ११,४८३ जणांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाच्या मदतीने करण्यात आले. त्यानुसार १४६० शिक्षकांची, १७८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अशी १६४६ जणांची ६४ तपासणी केंद्रांवर आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली. तपासणी केल्याशिवाय शिक्षकांना वर्गात प्रवेश नाही. त्या तपासणीत शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतही भीतीचे वातावरण आहे, तर आरोग्य विभागाकडून एकदम तपासणीचा आकडा वाढल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही भर पडत असल्याने आरोग्य विभाग अधिक दक्ष झाला असून, उर्वरित शिक्षकांच्या तपासण्यांचे दिव्य शनिवार आणि रविवारमध्ये पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्वच शिक्षक सोमवारी तपासणी करून हजर राहू शकण्याची शक्यता मावळली आहे.

चार तालुक्यांत आढळले शिक्षक बाधितफुलंब्री २, औरंगाबाद ग्रामीण २, कन्नड तालुक्यात ४, पैठण तालुक्यात १, अशा नऊ जणांचा बाधित आढळून आलेल्यांत समावेश असून, बाधित आढळून येत असलेल्यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले, तर त्यांच्यावर तेथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. शहरात सर्वाधिक चाचण्या झाल्या असून, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, फुलंब्रीत तपासणीचे प्रमाण अधिक आहे.

औरंगाबादेत १३९३ शिक्षकांची कोरोना तपासणीराज्य शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेतर्फे शहरात शुक्रवारी १३९३ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शहरात १६ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. n  गुरुवारी केलेल्या कोरोना चाचणीचा  अहवाल प्राप्त झाला. यामध्ये एकूण आठ शिक्षक पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. यात ३ मनपा हद्दीतील व ५ बाहेरील शिक्षक आहेत. चिकलठाणा आरोग्य केंद्र, रामनगर, रिलायन्स मॉल, शिवाजीनगर, तापडिया कासलीवाल मैदान, एन ८, एन ११, एन २, छावणी, सिपेट कोविड सेंटर, किलेअर्क, एमजीएम आदी ठिकाणी चाचणी होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद