शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात ५ महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये कोरोना मृत्यूत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 16:50 IST

corona virus death जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता.

ठळक मुद्देकोरोनामुळे दोनशेवर होणारे मृत्यू ७६ वर

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ५ महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूत मोठी घट झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. दर महिन्याला दोनशेवर मृत्यू होत होते; परंतु नोव्हेंबरमध्ये केवळ ७६ रुग्णांचा मृत्यू झाला. गंभीर रुग्णांची संख्या घटल्याने मृत्यूची संख्या तिहेरीवरून दुहेरी आकड्यात आली आहे.

जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत होता. अनेक उपायोजना करूनही मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत होती; परंतु तब्बल ६ महिन्यांनंतर पहिल्यांदा ८ नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या मृत्यूसत्राला ब्रेक लागला. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजीही जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही. ऑक्टोबरपासून नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णंसंख्येतही मोठी घट झाली. 

धोका कायम, नियम पाळाकोरोनाचा धोका कमी झालेला नाही. रुग्णसंख्या ही कमी-अधिक होईल; पण मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या बाबींचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते; परंतु नागरिकांनी विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. - डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

जिल्ह्यातील कोरोना मृत्यू कालावधी    एकूण मृत्यू ५ एप्रिल ते १२ मे    १७ १३ मे ते ३० जून    २४६ १ ते ३१ जुलै     २०६ १ ते ३१ ऑगस्ट    २३० १ ते ३० सप्टेंबर    २३९ १ ते ३१ ऑक्टोबर    १३४ १ ते ३० नोव्हेंबर    ७६१ ते ६ डिसेंबर    १० 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद