शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीची; निगेटिव्ह प्रमाणपत्र असणाऱ्यांना दुकान उघडण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:18 IST

भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला. भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल, त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी पथके१ जिल्हा व्यापारी महासंघ, भाजीपाला विक्रेत्यांच्या संघटना आणि इतर व्यापाऱ्यांशी समन्वय साधून महापालिकेने शनिवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत तब्बल पंधरा मोबाईल टीम तपासणीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. २ निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्याला जागेवरच कोविड-१९ निगेटिव्ह, असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन टीम तैनात राहतील. ३ पहिल्या टप्प्यात ज्या व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांनी तपासणी करून घ्यावी, मगच दुकान उघडावे, असे आवाहन पाण्डेय यांनी केले.

दुसऱ्या टप्प्यात सर्व व्यापाऱ्यांचा समावेशमेडिकल दुकानदार, पंक्चर दुकानदार यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांना २५ ते ३१ जुलैपर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शहरात व्यापक प्रमाणात तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यात जास्तीत जास्त नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी, असेही प्रशासकांनी नमूद केले.

चारशे कर्मचाऱ्यांची टीम सध्या संचारबंदीत पोलिसांसोबत प्रत्येक पॉइंटवर काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी नेमण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या टीमसोबत हे कर्मचारी मदतनीस म्हणून काम करतील. अनेक ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातभाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रीची दुकाने, किराणा दुकानदार यांना बंधनकारक.

दुसऱ्या टप्प्यातमेडिकल, पंक्चर दुकानचालक आदी सर्व व्यापाऱ्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक.

१० जुलैपासून महापालिकेने नागरिकांच्या अधिक सोयीसाठी अत्याधुनिक अँटिजन टेस्टला सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसांपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यावर भर देत आहे. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या भागात पूर्वीप्रमाणेच व्यापक प्रमाणात अँटिजन टेस्ट करण्याचे काम सुरू राहणार आहे.

शनिवारी रात्री १२ वाजता रविवारपासून शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होईल म्हणून महापालिका प्रशासनाने शुक्रवारी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. याची माहिती देताना प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले की, रविवारी ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल.

औरंगाबादकरांचे आरोग्य आता त्यांच्याच हातीशहरातील प्रत्येक नागरिकाला स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. ४ज्या व्यापाऱ्याकडे कोरोना टेस्ट केलेले प्रमाणपत्र नसेल त्याच्याकडून कोणतेही सामान खरेदी करण्यात येऊ नये, असे आवाहन औरंगाबादकरांना प्रशासक पाण्डेय यांनी केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद