शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Corona In Aurangabad : आणखी ६ मृत्यू; १०८ बाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या ३२२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:33 IST

हर्सूल कारागृहात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९१ कोरोनाबाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३२२४ झाली आहे. तर आणखी सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. १७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

घाटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घाटी परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीला १७ जून रोजी भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शिवशंकर कॉलनी येथील ६४ वर्षीय वृद्धाला ३१ जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. उच्च रक्तदाब, कोरोनामुळे न्युमोनिया, सेप्टिक शॉक सेप्टीसीमियामुळे त्यांचा गुरुवारी दुपारी एक वाजता मृत्यू झाला. आझाद चौक, रहिमनगर येथील ४४ वर्षीय रुग्णाला गुरुवारी भरती करण्यात आले होते. त्यांच दिवशी सायंकाळी ६.४५ त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांना तीव्र श्वसन विकार व कोरोनामुळे न्युमोनिया त्यांच्या मृत्यूचे कारण देण्यात आले.

रोशन गेट येथील ६५ वर्षीय महिलेला गुरुवारी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांचा कोरोनामुळे तीव्र श्वसन विकार, न्युमोनिया, उच्चरक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाला. रहेमानिया कॉलनी येथील ६५ वर्षीय वृद्धाला १३ जुन रोजी भरती करण्यात आले होते. गंभीर किडनी विकाराने ते ग्रस्त होते. त्यांना कोरोनामुळे तीव्र श्वसनविकार, न्युमोनीया झाल्याने त्यांचा मृत्यु शुक्रवारी पहाटे तीन वाजता झाला. आकाशवाणी परीसरातील ६७ वर्षीय व्यक्तीला १० जुन रोजी भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्चरक्तदाबासह कोरोनामुळे तीव्र श्वसनविकार, न्युमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.

आज १०८ बाधितांची वाढआज आढळलेल्या रुग्णांत हर्सूल कारागृह ५, एसबी नगर १, उस्मानपुरा ३,  बजाज नगर २, अहिंसा नगर १, अंगुरी बाग १, जहाँगीर कॉलनी १, लोटा कारंजा १, खामगाव, फुलंब्री १,  झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, राजननगर १, बायजीपुरा १, रहिमनगर १, युनूस कॉलनी १, हनुमान चौक चिकलठाणा १, रामनगर १, बजाजनगर २, रशीदपुरा १, नारळीबाग २, क्रांतीनगर १, अंबिकानगर १, पुंडलिकनगर ३, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, हर्सूल २, एन-९ सिडको २, एन-११ सिडको २, मिलकॉर्नर १, एन-५ सिडको १, एन-८ सिडको १, शिवाजीनगर १, जाधववाडी २, शंभूनगर ४,  चिकलठाणा ५, रामकृष्णनगर २, ईटखेडा २, विश्वभारती कॉलनी २, बीड बायपास १, न्यू हनुमाननगर २,  जयहिंदनगर, पिसादेवी १, भानुदासनगर १, श्रीविहार कॉलनी, बीड बायपास ३, जाधववाडी १, पळशी १, आरिश कॉलनी १, गौतमनगर, प्रगती कॉलनी १, द्वारकानगर, हडको १, समतानगर १, शिवाजीनगर २, लहूनगर २, रामनगर १, ब्रिजवाडी १, शहानूरवाडी ४, मुजीब कॉलनी ५, रामेश्वरनगर २, न्यू विशालनगर १, मयूरनगर १, बुढीलेन १, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १,  सिडको महानगर १, लोकमान्य चौक, बजाजनगर २, सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ४, साऊथ  सिटी, सिडको महानगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, सारा गौरव, बजाजनगर १ या भागांतील कोरोनाबाधित आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद