मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी सातत्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. मराठा समाजाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा क्रांती ठोक मोर्चाने दिला होता. आंदोलनाच्या तयारीत असलेले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे पदाधिकाऱ्यांची काल रात्रीपासून धरपकड करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. राज्य समन्वयक किरण काळे पाटील व कृष्णा पाटील उघडे यांना काल रात्रीपासूनच एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि. भागवत नागरगोजे यांनी ताब्यात घेतले. तर बिडकीन येथे स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे, संतोष कुसेकर, दत्ता पाटील मोगल, विजय शेळके, आप्पासाहेब जाधव, अनिल कुटे, धनंजय चिरेकर, नारायण नरवडे, किशोर जाधव, गणेश जाधव या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी आंदोलनाच्या तयारीत असताना बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:05 IST