लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील चार तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत. आगामी काळात संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, रामेश्वर भांदरगे, माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांना होणार आहे. तसेच नियमित कर्ज भरणाºयांना २५ हजार रुपयांपर्यंत शासन मदत देणार आहे. जालना जिल्ह्यात १ लाख ९६ हजार शेतकºयांचे २ हजार कोटी रुपये कृषी कर्ज थकीत आहे. निकषात बसणाºया शेतकºयांना यामधून १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची मदत होईल.जिल्ह्याला या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ८ लाख ५६ हजार वृक्षांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली असून, त्याचे संगोपनही करण्यात येत आहे. वृक्ष लागवड ही केवळ मोहीम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या व कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपण व संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.आॅनलाईन सातबाराच्या कामामध्ये आघाडीवर असून जिल्ह्यातील एकूण २ लाख ४४ हजार ५४१ सातबारांपैकी २ लाख ४३ हजार ६३० सातबारांची तपासणी करून जिल्हा मराठवाड्यात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. यावेळी पोलीस पथकाने मानवंदना दिली. जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी, कर्मचारी तसेच स्काऊट, गाईडचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
हगणदारीमुक्तीसाठी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:10 IST