शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कूलींच्या आयुष्याची गाडी ट्रॅकबाहेर; चाकाची बॅग, लिफ्ट, सरकत्या जिन्यानंतर आता कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:46 IST

लॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले.

ठळक मुद्देकोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत.एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महानायक अमिताभ बच्चन यांचा कूली चित्रपट आणि त्यातील ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं’ या गाण्यातून प्रवाशांच्या ओझ्याने आयुष्याची गाडी ओढणाऱ्या कूलींचे प्रश्न जगासमोर आले. पुढे गोविंदाच्या ‘कूली नंबर वन’ चित्रपटातूही मनोरंजनात्मक पद्धतीने कूलींची अवस्था मांडण्यात आली.

चित्रपट हीट झाले; पण कूलींचे प्रश्न तसेच राहिले. कोरोनामुळे आता तर त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा, चारचाकीतून प्रवासी उतरतात, तेव्हा लाल रंगाचा शर्ट परिधान केलेले कूली आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहतात. ‘ए कूली... ए कूली...’ अशी हाक एखादा प्रवासी मारेल, याकडे त्यांचे कान असतात; परंतु प्रवासी कूलींकडे दुर्लक्ष करतात, कोणी जवळ आले तर सरळ दूर करतात. चाकाची सुटकेस, बॅग ओढत रेल्वेस्टेशनमधून रवाना होतात. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या असेच दृश्य पाहायला मिळते आहे. प्रवासात कमी सामान घेऊन जाण्याचा वाढलेला कल, हँडल-चाकाच्या सुटकेस, बॅगमुळे ओझे कमी झाले. त्याचा फटका बसला तो कूलींनाच. रेल्वेस्टेशनवर काही वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, सरकत्या जिन्यांची सुविधा करण्यात आली. या सुविधांनी कूलींच्या बेरोजगारीचे संकट गडद झाले. त्यात आता कोरोनाची भर पडली आहे. कोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत. रेल्वेस्टेशनवर सध्या १४ कूली आहेत; परंतु एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कूलींपुढे उभा राहिला आहे. रेल्वे प्रशासन आणि ज्यांनी कूलींच्या अभिनयातून स्वतःचे विश्व उभे केले, किमान ते तरी कूलींच्या मदतीसाठी येतील का, असा प्रश्न या कूलींना पडतो आहे. जगायचे कसे, हा प्रश्न कूली शेख रफिक म्हणाले, कोरोनामुळे  रेल्वे बंद केल्या. कूली कसे जगतील, याचा कोणी  विचारही केला नाही. तरीही कसे तरी दिवस काढले; पण आता तर भीतीने प्रवासी जवळही येऊ देत नाहीत. 

लॉकडाऊनमध्ये सामाजिक संस्थांची मदतलॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले. एक-एक दिवस कसे काढले, हे सांगताही येत नाही. आताही रेल्वेंची वाहतूक पूर्ववत नसल्याने रेल्वेस्टेशनवर कामच उरले नाही. त्यामुळे सिमेंटच्या गोण्या उतरविण्यासह मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहे. -राहुल दुसिंग, कुली

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद