कन्ऩड तालूक्यातील ४० चालक व वाहक व पाच बस मुंबईला पाठविण्यात आले. त्यामुळे १०१ बस फेर्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागातील जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी कन्नड आगाराच्या ४६ शेड्युलमध्ये २०४ फेऱ्या होत असून दिवसभरात सर्व बसचा प्रवास १७ हजार किलोमीटर पर्यंत होत असे. आगाराकडे ९२ चालक व ८३ वाहक होते. दरम्यान ७ चालक व ६ वाहक सेवानिवृत्त झाल्याने सद्यस्थितीत ८५ चालक व ७७ वाहक कार्यरत आहेत. त्यापैकी आगारातील २० चालक व २० वाहक सद्या मुंबईच्या बेस्ट सेवेसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे सध्या ३३ शेड्युलमध्ये १०३ बसफेऱ्या चालविण्यात येत असून १२ हजार किमी रोजचा प्रवास होत आहेत. मुंबईहुन परतलेल्या २२ वाहकांपैकी २ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. आगाराकडे ५४ बस आहेत. त्यापैकी ५ बस मुंबईला गेलेल्या असुन ४५ बस प्रत्यक्षात कार्यरत आहेत. तीसगाव, कळंकी, फुलंब्री, दिगाव, करंजखेड, भारंबा, सिल्लोड व गंगापूर हे शेड्युल बंद ठेवली आहेत, अशी माहिती आगारप्रमुख कमलेश भारती यांनी दिली.
मुंबईच्या प्रवाशांची सोय ग्रामीण प्रवाशांच्या मुळावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST