शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

२० टक्के अनुदानाला विरोध

By admin | Updated: June 14, 2016 23:52 IST

औरंगाबाद: राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या २० टक्के अनुदानाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध दर्शविला

औरंगाबाद: राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या २० टक्के अनुदानाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध दर्शविला हा निर्णय शाळा आणि शिक्षकांवर अन्याय करणारा असून, आघाडी सरकारच्या काळात ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या शाळांना नियमाप्रमाणे अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. विनाअनुदानित शाळा आणि संस्थाचालक शिक्षक कृती समितीतर्फे औरंगाबादमध्ये १४ दिवसांपासून धरणे आणि उपोषण आंदोलन सुरूआहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विखे पाटील मंगळवारी येथे आले होते. या आंदोलनाच्या दरम्यान जाफराबाद (जि. जालना) येथील गजानन खरात या शिक्षकाचा मृत्यू झाला.खरात यांचा बळी शासनाने घेतल्याचा आरोप करीत हे शासन अनुदान कसे देता येणार नाही, याचेच नियोजन करीत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील म्हणाले की, कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासंदर्भात आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. मात्र सध्याचे सरकार दीड वर्षापासून चालढकल करीत आहे. युती सरकारच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र त्यांना कर्जमाफी मिळत नाही, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत मात्र त्यांचे शिक्षणशुल्क माफ केले जात नाही, आता शिक्षकही आत्महत्या करू लागला असून सरकार अनुदान द्यायला तयार नाही. मध्यावधी झाल्यास राज्यात काँग्रेसचे सरकार येण्यावाचून पर्याय नाही. तेव्हा कायम विनाअनुदानित शाळांचे आणि शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, इब्राहिम पठाण, मनोज पाटील, एस. पी. जवळकर आदी उपस्थित होते. सनातनवर बंदी हवीसनातन संस्थेचे अटक झालेले डॉ. वीरेंद्र तावडे हेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे सूत्रधार असल्याचे सीबीआयच्या माहितीवरून स्पष्ट होत असून, सनातनवर सरकारने ताबडतोबीने बंदी आणावी, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. तर पुरावेही देऊ युती सरकारमधील विविध मंत्र्यांचे घोटाळे समोर आले आहेत. खडसे यांना त्यामुळे राजीनामा द्यावा लागला. आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा जमीन घोटाळा समोर आला आहे. खडसेंची निवृत्त न्यायमूर्तींबाबत चौकशी सुरूआहे. सरकारमधील निम्मे मंत्रिमंडळ घोटाळ्यांमध्ये गुंतले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायला तयार आहोत. मात्र शासनाने ‘कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करावी, असेही विखे पाटील म्हणाले.