शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावाढीला हातभार; खाजगी प्रयोगशाळा स्वॅब घेऊन पाठवितात घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:32 IST

शहरात ४ खाजगी प्रयोगशाळांना मनपाकडून स्वॅब तपासणीची परवानगी देण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देमनपा, आरोग्य विभाग म्हणते, संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक खाजगी प्रयोगशाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : महापालिका, आरोग्य अधिकारी स्वॅब घेतल्यानंतर संशयितांना संस्थात्मक क्वारंटाईन करणे बंधनकारक असल्याचे सांगतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून खाजगी प्रयोगशाळा स्वॅब घेतल्यानंतर संशयितांना घरी पाठवीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोरोनावाढीला हातभार लावणारा ठरत आहे; परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शहरात ४ खाजगी प्रयोगशाळांना मनपाकडून स्वॅब तपासणीची परवानगी देण्यात आलेली आहे.  औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या का वाढत आहे, याचे उत्तर शोधण्यात आणि ही वाढ रोखण्यास प्रशासन, आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ होऊ नये म्हणून प्रत्येक संशयित रुग्णास संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सूचना आहे; परंतु हा नियम केवळ घाटी आणि मनपाकडे तपासणी करणाऱ्यांसाठीच लागू आहे का. कारण खाजगी प्रयोगशाळा स्वॅब घेतल्यानंतर संशयिताना सरळ घरी सोडत आहेत. संशयित रुग्णांस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा नियम त्यांच्यासाठी नाही का. असेलही; पण ते नियमांची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहणे नको म्हणून अनेकांनी स्वॅब तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळेचा रस्ता धरला. हा प्रकार कोरोनाचा प्रसार होण्यासाठी हातभार लावणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संस्थात्मक क्वारंटाईनची सूचनाशहरात ४ खाजगी प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडून आता घरी जाऊन स्वॅब घेतले जात नाही. ज्या डॉक्टरने संदर्भित (रेफर) केले, त्यांच्या रुग्णालयात स्वॅब घेतला जातो. पूर्वी त्यांच्याकडून संशयिताना होम क्वारंटाईन केले जात होते. आता संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याची सुरुवात होईल, असे मनपाच्या डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले आहे.

शुल्क आकारणीही अधिकप्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये शुल्क न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये शुल्क घ्यावे, असा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला. मात्र, तेथे अद्यापही २८०० रुपयेच आकारण्यात येत आहेत.

1,281 स्वॅब तपासणी, 117 पॉझिटिव्हशहरात २३ जूनपर्यंत खाजगी प्रयोगशाळांमध्ये १ हजार २८१ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यातील ११७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे पॉझिटिव्ह रुग्ण स्वॅब देण्यासाठी गेले. त्यानंतर परत घरी आणि अहवाल आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात गेले असतील, तर या सगळ्यात अन्य लोकांना बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वॅब देऊन घरी जाता येईल...‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी एका खाजगी प्रयोगशाळेशी संपर्क साधला. स्वॅब तपासणी करायची असल्याचे सांगितले. तेव्हा प्रयोगशाळेच्या व्यक्तीने एका रुग्णालयात यावे लागेल. डॉक्टर तपासणी करतील. त्यानंतर स्वॅब घेतला जाईल. त्यासाठी २८०० रुपये लागतील, असे सांगितले. स्वॅब घेतल्यानंतर घरी जावे लागेल की, रुग्णालयात थांबावे लागेल, अशी विचारणा केली असता घरी जाता येईल, असे सांगितले. उद्या या, परवापासून नवीन नियम लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद