शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:59 IST

मान्सूनपूर्व तयारीमध्ये सर्व विभागांनी आपल्या कार्यालयांमध्ये २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू ठेवावा. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मान्सूनपूर्व तयारीमध्ये सर्व विभागांनी आपल्या कार्यालयांमध्ये २४ तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू ठेवावा. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीची बैठक घेण्यात आली. यावेळी पैठणचे तहसीलदार महेश सावंत, जायकवाडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अजेय चौधरी, पोलीस, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करताना सर्वांगीण बाबींचा विचार करून आराखडे अद्ययावत करावेत. संभाव्य पूरस्थितीमुळे बाधित होणाºया गावांबाबत दक्ष राहावे. वेळीच करावयाच्या उपाययोजना यासाठी सतर्क असावे. प्रत्येक विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या नोडल अधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत दक्ष राहून कामे बिनचूकपणे पार पाडावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांसह, आवश्यक त्या ठिकाणांची पाहणी करून कार्यवाही पार पाडावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ डागडुजी करावी.आरोग्य विभागाने औषधींच्या साठ्यासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. पोलीस यंत्रणेने आपत्ती काळात आवश्यक असणाºया बाबी, जलतरणपटूंची यादी अद्ययावत करून जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक त्या कार्यवाहीसह पाठवावी.महावितरणने आपत्ती काळामध्ये येणाºया अडचणी, विजेचा धोका लक्षात घेऊन नियंत्रण कक्षासह आवश्यक अधिकाºयांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील धरणांबाबत दैनंदिनरीत्या अहवाल पाठवावा, तसेच आवश्यक असणारी कार्यवाही तात्काळ पार पाडावी, अशा सूचना शेळके यांनी बैठकीत दिल्या.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRainपाऊस